राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून महिला पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले असून, त्यांना आता १२ ऐवजी ८ तासांची ड्युटी असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र सरकारने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी दिली आहे.

कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार – सुप्रिया सुळे

“महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार.” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट्द्वारे म्हटलं आहे.

पुणे ग्रामीण मधील महिला पोलिसांना ८ तास ड्युटी; ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहिती

पोलीस विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून वारंवार ८ तासांची ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण मधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ८ तासांच्या ड्युटी या अगोदर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे. पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याबाबत माहिती दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra govt has decided to reduce the working hours of women police personnel from 12 hours to 8 hours msr
First published on: 24-09-2021 at 15:40 IST