नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या महिलांच्या आगामी ‘एएफसी’ आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपासून चित्रफीत साहाय्यक सामनाधिकारी (व्हीएआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. भारतातील फुटबॉल स्पर्धात ‘व्हीएआर’चा वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा आशियाई चषक स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे रंगणार आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी या दोन मैदानांवर सामनाधिकाऱ्यांना ‘व्हीएआर’ तंत्रज्ञान उपलब्ध असणार आहे. आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयांचा उच्च स्तर राखण्यासाठी प्रयत्नशील असून स्टेडियम आणि संघांच्या सराव केद्रांवर ‘व्हीएआर’ची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच हे तंत्रज्ञान सामन्यांमध्ये वापरले जाईल. या स्पर्धेसाठी सहा चित्रफीत सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना विविध कोनांत बसवलेल्या सात कॅमेऱ्यांमधून चित्रण केले जाणार आहे. गोल आहे/नाही, पेनल्टी आहे/नाही, थेट लाल कार्ड, तसेच लाल किंवा पिवळे कार्ड चुकीच्या खेळाडूला दिले जाणे, या चार निर्णयांतील चुका टाळण्यासाठी ‘व्हीएआर’चा वापर केला जाईल, मात्र ‘व्हीएआर’चा सल्ला नाकारण्याची सामनाधिकाऱ्यांना परवानगी असेल.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Var use in indian women s asian cup football tournament zws
First published on: 10-01-2022 at 02:55 IST