वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास बस बंद पडल्याने २० ते २५ प्रवासी अडकून पडले होते. या अडकून पडलेल्या प्रवाशांची पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील दोन दिवसांपासून वसई विरार शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वसई विरारमधील बहुतांश रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. त्यात वसई पश्चिमेच्या भागात असलेला सनसिटी गास रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रस्त्यावरून गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मोठ्या खासगी बसमधून काही प्रवासी प्रवास करीत होते. या साचलेल्या पाण्यात ही बस अचानकपणे बंद पडली. त्यामुळे यात बसलेल्या प्रवाशांची कोंडी झाली होती.

हेही वाचा – कांदळवनात अतिक्रमण; सात गुन्हे दाखल, महसूल विभागाची कारवाई तीव्र

हेही वाचा – महामार्ग, वर्सोवा पुलावर खड्डय़ांची समस्या कायम; ठेकेदारावर अद्याप गुन्हा दाखल नाही

याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना जीव सुरक्षा जॅकेट व लाईफ रिंग यांच्या साहाय्याने हळूहळू बाहेर काढण्यात आले आहे. सुमारे २० ते २५ प्रवासी नागरिकांची या बंद पडलेल्या बसमधून सुटका केली आहे. बसचे सेन्सर लॉक झाल्याने बस बंद पडली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. सदरची कामगिरी सनसिटी, श्रीप्रस्था व आचोळे या अग्निशमन केंद्राच्या जवानांनी केली आहे. या प्रवाशांना जाण्यासाठी परिवहन सेवेच्या एका बसची व्यवस्था करण्यात आली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 to 25 passengers were stranded as the bus stopped at sun city area of vasai west around 7 am on thursday ssb
First published on: 20-07-2023 at 10:10 IST