वसई आणि विरारमधल्या काशिमीरा या ठिकाणी २८ वर्षांपूर्वी एक हत्या झाली होती. या हत्येनंतर पोलिसांनी २८ वर्षांनी पहिली अटक केली आहे. २८ वर्षांपूर्वी एक महिला आणि तिच्या चार मुलांची हत्या झाली होती. ही महिला काशिमीरा या ठिकाणी राहात होती. या प्रकरणात गुरूवारी पोलिसांनी पहिली अटक केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

२८ वर्षांनी राजकुमार चौहान नावाच्या खुन्याला अटक
या प्रकरणात जे तीन गुन्हेगार होते त्यापैकी राजकुमार चौहान हा एक होता. या हत्या नोव्हेंबर १९९४ ला झाल्या होत्या. राजकुमार चौहानला गुरूवारी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
त्याचे साथीदार अनिल आणि सुनील सरोज हे दोघं फरार आहेत.

नेमकं काय घडलं?
अविराज कुराडे यांनी गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जेव्हा जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आत्तापर्यंत ज्या केसेसचा उलगडा झाला नाही अशा केसेस हाती घेतल्या. काशिमीरा या ठिकाणी घडलेली घटना अशीच होती. तसंच अशा ११ घटना आत्तापर्यंत समोर आल्या ज्यांचा उलगडा झआलेला नाही. यामध्ये समोर आली ती घटना म्हणजे २८ वर्षांपूर्वीची सामूहिक हत्याकांडाची घटना होती.

काय घडली होती घटना?
नोव्हेंबर १९९४ मध्ये जगराणी देवी प्रजापती आणि त्यांच्या चार मुलांची हत्या करण्यात आली. ज्या चार मुलांना हत्या करणाऱ्यांनी संपवलं त्यामध्ये एका तीन महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. जगराणी देवी यांचे पती २००६ मध्ये एका अपघातात मारले गेले. मात्र जगराणी देवी यांची आणि त्यांच्या मुलांची हत्या कुणी केली? हा प्रश्न अनुत्ततरीतच होता. ज्यानंतर आम्ही छडा लावला आणि या प्रकरणात एकाला अटक केली अशी माहिती कुराडे यांनी दिली.

पोलिसांनी जेव्हा या घटनेतल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरूवात केली तेव्हा पोलिसांना हे समजलं की सगळे आरोपी हे उत्तर प्रदेशातले आहेत. ज्यानंतर पोलिसांनी त्यांचं एक पथक उत्तर प्रदेशला पाठवलं. २०२१ मध्ये हे पथक उत्तर प्रदेशात गेलं होतं. त्यांनी तिथे राहून तसंच उत्तर प्रदेश टास्क फोर्सची मदत घेऊन आरोपींचा शोध घेतला. जी माहिती आम्हाला मिळआली होती त्यानंतर आम्ही काही फोन हे सर्व्हिलन्सवरही टाकले. त्यात आम्हाला राजकुमार चौहान हा कतारमध्ये गेल्याचं समजलं. त्याच्या पासपोर्टचे डिटेल्स आम्ही शोधले. त्यानंतर त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली अशी माहितीही कुराडे यांनी दिली.

पहिल्या आरोपीला २८ वर्षांनी अशी केली अटक

गुरूवारी राजकुमार चौहान हा मुंबई विमानतळावर आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याला कोठडीत ठेवलं आहे. अनिल आणि सुनील या दोघांसह मिळून राजकुमार चौहानने या हत्या केल्या. जगराणी देवी यांचा हात या तिघांपैकी एका आरोपीने धरला होता. त्यामुळे जगराणी देवी यांचा भाऊ आणि या तिघांमध्ये भांडण झालं होतं. याचा बदला घेण्याचं या तिघांनी ठरवलं. त्यानंतर एक दिवस जगराणी देवी यांचा नवरा घराबाहेर गेला आहे हे पाहून या तिघांनी घरात घुसून जगराणी देवी आणि त्यांच्या चारही मुलांची हत्या केली. त्यांच्या रक्ताने माखलेले कपडे तिथेच टाकले आणि पळ काढला. या प्रकरणात २८ वर्षांनी पहिली अटक झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही आता राजकुमार चौहानची चौकशी करतो आहोत. त्याच्या चौकशीतून इतर आरोपींचीही माहिती मिळेल आणि त्यांनाही आम्ही लवकरच अटक करू असा विश्वास कुराडे यांनी व्यक्त केला आहे.