वसई- खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. तेरेजा लोपीस असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. बुधवारी सकाळी विरार पश्चिमे्च्या जकात नाका येथे हा अपघात घडला. खड्ड्यामुळे एका महिलेचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विरारच्या आगाशी येथील मेरभाट परिसरात तेरेजा लोपीस (५७) रहात होत्या. त्या शिक्षिका असून बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या.

हेही वाचा >>> वसई : रणजीपटू सुरेश देवभक्त यांचे निधन

विरार पश्चिमेच्या जकात नाका येथे खड्डयामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि त्या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी बोळींज येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खड्डयामुळे महिलेचा बळी गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आप पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.