भाईंदर- मिरा भाईंदर महापालिकेच्या शिवसेनेच्या ८ नगरसेवकांनी गुरूवारी एकनाथ शिंदे याना पाठिंबा जाहीर केला. गुरूवारी या ८ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शिवसेनेतूनही वाढता पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण मधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. गुरूवारी मिरा भाईंदर महापालिकेतील ८ नगरसेवकांनी

मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट पाठिंबा जाहीर केला. त्यामध्ये धनेश पाटील, संध्या पाटील, वंदना पाटील, हेलन जोर्जी, कुसुम गुप्ता तर नगरसेवक राजू भोईर, एल एस बांड्या, अनंत शिर्के यांचा समावेश आहे. सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांनी १८ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात ८ नगरसेवकच शिंदे गटात गेले. उर्वरित नगरसेवक अद्यापही मूळ शिवसेनेत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता शैलेश पांडे यांनी दिली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरा भाईंदर महापालिकेत एकूण ९५ नगरसेवक आणि ५ स्विकृत नगरसेवक आहेत. त्यात शिवसेनेच्या २२ नगरसेवकांचा समावेश होता. करोना काळात शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांचे निधन झाले. दीप्ती भट आणि अनिता पाटील या दोन नगरसेविकांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे एकूण १९ नगरसेवक होते. त्यापैकी