स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा अभियना सुरू आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. घरांवर तिरंगा ध्वज लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वसई ते विरार अशी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

वसईतून सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप, सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास विरार येथे झाला. शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या पदयात्रेचे वैशिष्ट्य ठरले.

तब्बल ३०० फुटांहून अधिक लांबीचा तिरंगा हे या पदयात्रेचे प्रमुख एक वैशिष्ट्य होते. सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी यांनी हा तिरंगा हाताने उचलून धरला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिरंग्याचे हे छत्र आपल्या डोक्यावर असून, या तिरंग्याच्या छत्राखाली देशातील जनता एकसंध होत, आपल्या या देशाचे नाव संपूर्ण विश्वात आणखी उज्ज्वल व्हावे यासाठी कटीबद्ध आहे, असा संदेश या पदयात्रेच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करण्यात आला.