विरार : शहरात अनेक ठिकाणी कचरा जळण्याच्या, पेटवणाच्या घटना समोर येत आहेत यामुळे शहारात धुराचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई, विरारमध्ये पालिकेकडून अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नसल्याने मोठय़ा प्रमाणात कचरा साचत आहे. त्यात घराच्या डागडुजीतून आणि इमारतीच्या बांधकामात निघालेला राडारोडा रस्त्याच्या कडेला फेकला जात आहे. त्यात अनेक दुकानातील कचरा सुद्धा रस्त्यावर टाकला जात आहे. यामुळे शहरातील विविध रस्त्यावर कचरम्य़ाचे ढिग निर्माण होत आहेत. याच कचरम्य़ाला काही वेळेस उन्हाने आगी लागत आहेत. तर काही ठिकाणी कचरा कमी करण्यासाठी नागरिक आगी लावत आहेत. सातत्याने कचरा पेटवला जात असल्याने धुराचे लोट निघून हवेच्या माध्यमाने इतरेतर पसरत आहेत. यामुळे नागरिकांना श्वस घेण्यास अडचणी येत आहेत. या धुराचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार पुर्व परिसरात जिवदानी मंदिराच्या मागच्या रस्त्यावर सातत्याने कचरा पेटवला जात आहे. त्याच बरोबर मनवेल पाडा परिसरात मोठय़ा प्रमाणात लक्सरी बस उभ्या केल्या जातात, यामागे असलेल्या मैदानात या बस धाकरकांकडून बसचे टायर, फर्निचर पेटवले जातात. नालासोरापारा संतोष भुवन, धाणीव बाग परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा भंगारची दुकाने आहेत. या दुकानातून निघनारा कचरा हे दुकानदार रस्त्याच्या कडेला जाळत असतात. तर महामार्गावर अनेक औद्य्ोगिक कंपन्या आपल्या कारखान्यातील कचरा महामार्गावर टाकतात आणि कोणतीही कारवाई होऊ  नये म्हणून त्याला आग लावतात. हा कचरा औद्य्ोगिक कचरा असल्याने नागरिकांच्या आरोग्याला याचा धोका निर्माण झाला आहे. तर पालिकेच्या कचराभूमीत पालिकेने काणतेही नियोजन केले नसल्याने या कचराभुमीचा कचरा सतत पेटत असतो. एकुणच शहरात कचरा पेटवण्याचे प्रकार वाढत असताना पालिका कोणतेही कारवाई करत नाही.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asphyxiation burning waste vasai virar types garbage burning at many places ysh
First published on: 11-11-2022 at 00:02 IST