निवडणूक कामामुळे फटका बसल्याचा पालिकेचा दावा;  चालू वर्षांत विक्रमी वसुली अपेक्षित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसई-विरार महापालिकेने मालमत्ता कराचे ३०० कोटींचे उद्दीष्ट पूर्ण केले असले तरी फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे पालिकेला २५ कोटींचे अपेक्षित उत्पन्न जमा करता आले नाही. मात्र तरीदेखील पालिकेने चालू आर्थिक वर्षांत ३२५ कोटींचे करवसुली करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

वसई विरार महापालिकेने मागील वर्षी करोना काळात मालमत्ता करापोटी २२१ कोटी रुपयांचे उत्पन्न जमवले होते. त्यानंतर अधिकाअधिका मालमत्ता कराचे उत्पन्न मिळविण्यासाठी विविध उपायोयजना सुरू केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने मालमत्ता कर वसुलीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली होती. १४ मार्चपर्यंत पालिकेने २९७ कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली आहे.

करोनाची तिसरी लाट ओसरल्याने राज्य निवडणूक आयोगाने वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यासाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना शहराच्या रचनेची माहिती असते. त्यामुळे फेब्रुवारीत घरपट्टी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रभाग रचनेच्या कामात घेण्यात आले होते. त्याचा परिणाम मालमत्ता कर वसुलीवर झाला. त्या महिन्यात कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने आम्हाला किमान २५ कोटींची कर वसुली करता आली नाही, असे उपायुक्त (कर) प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली.

५ हजारांहून अधिक मालमत्ता जप्त

मालमत्ता कर भरणे नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी पालिकेने विशेष उपाययोजना केल्या होत्या. विविध माध्यमाद्वारे कर भरण्याची सोय नागरिकांना उपलब्ध करून दिली होती. डिजिटल तसेच ऑनलाईन माध्यमाच्या सोयीमुळे नागरिकांना कर भरता आला. याशिवाय कर न भरणाऱ्यांवर पालिकेने कठोर कारवाई केली होती. पालिकेने ५ हजार ७०६ मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यातील ३ हजार ५७२ नागरिकांनी कराचा भरणा केला. सध्या पालिकेने जप्त केलेल्या मालमत्ता या १ हजार १३४ असून त्यातून पालिकेला ८ कोटी ८५ लाख ४४ हजार रुपयांचा कर वसुली करणे बाकी आहे.

३२५ कोटींचे वसुलीचे लक्ष्य

पालिकेने मागील वर्षांपेक्षा यदांच्या चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता कराचे उत्पन्न शंभर कोटींनी वाढविण्याचे ठरवले होते. त्यानुसार नियोजन करण्यात आले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता. निवडणूकीच्या कामामुळे कर वसुली थंडावली असली तरी पुढील १५ दिवसात २५ कोटींची वसुली केली जाईल असा विश्वास उपायुक्त जांभळे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.  त्यामुळे यावर्षी पालिका ३२५ कोटींची विक्रमी वसुली करण्याची शक्यता आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcode solid waste management big decision municipality ysh 95
First published on: 15-03-2022 at 01:40 IST