लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई: एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी १ लाखांची लाच मागणाऱ्या तुळींज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र शेंडगे असे या लाचखोर पोलिसाचे नाव आहे. ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी यांचा केटरिंग आणि मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेंडगे यांच्याकडे होता. या गुन्ह्यात न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी शेंडगे यांनी एक लाखांची लाच मागितली होती. प्रत्येक प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पैसे द्यावेच लागतात असेही शेंडगे यांनी सांगितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रारदाराने ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शेंडगे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. परंतु त्यांना सापळा लावून रंगेहाथ पकडण्यात अपयश आले.

आणखी वाचा-नालासोपाऱ्यात टँकरचा ‘ब्रेक फेल’, टँकर थेट शिरला कार्यालयात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे मंगळवार रात्री शेंडगे यांच्यावर एक लाख रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियन १९८८ च्या कलम ७ आणि ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.