लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : खिडकीवाटे घरात प्रवेश करून साडेआठ लाखांचे दागिने चोरणार्‍या चोराला माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासात अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा सर्व मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

१३ डिेसेंबर रोजी वसई पश्चिमेच्या बाभोळा परिसरातील कौल हेरिटेज सिटी येथे राहणार्‍या कमलेश तावडे यांच्या घऱात साडेआठ लाखांची चोरी झाली होती. अज्ञात चोराने खिडकीतून प्रवेश करून ही चोरी केली होती. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरातील १०० हून अधिक सीसीसीटीव्ही तपासून आरोपी सन्नी सुनिल निवाते (२७) याला वसईच्या स्टेला येथून अटक करण्यात आली. त्याने चोरलेले सोन्याचे दागिने, महागडे घड्याळ आद साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अवघ्या २४ तासात पोलिसांनी तत्परतेने तपास करून चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात ३ गुन्ह्यांची नोंद आहे.

आणखी वाचा-मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे आदींच्या पथकाने केली