प्रसेनजीत इंगळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार : शासकीय कार्यालयात त्या कार्यालयातील सेवांची माहिती देणारा ‘नागरिकांची सनद’ फलक बंधनकारक असतानाही वसईतील बहुतांश शासकीय कार्यालयांत तो अस्तित्वातच नाही. कार्यालयीन सेवांची माहिती मिळत नसल्याने नागरिकांची फरपट होत आहे. शहरात सर्व शासकीय कार्यालयांत जनतेला पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा तपशील, योजना, धोरणे, विभागप्रमुखांची माहिती, नागरिकांना तक्रारी करण्याच्या सूचना याबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी तसेच या शासकीय कार्यालयाच्या सुविधा घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी शासनाने सन २००६ मध्ये माहिती अधिकार कायद्यात ‘नागरिकांची सनद’चा समावेश केला आहे.  सदरहू अधिनियमातील कलम ८ (१) व (२) नुसार प्रत्येक कार्यालयाने किंवा विभागाने नागरिकांची सनद तयार करून ती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘नागरिकांची सनद’चा फलक लावण्यास सांगितले होते. यात मुख्य कार्यालयांबरोबर उपशाखा कार्यालयातही हे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे, तहसील कार्यालये, तलाठी कार्यालये, वाहतूक शाखा, महसूल, भूमी अभिलेख किंवा इतर सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयांत ही सनद असणे आवश्यक आहे. तरीही शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांत ही सनद लावण्यात आलेली नाही. यामुळे कार्यालयाच्या सेवांची, दाखले, अर्ज, माहिती, तक्रारी, त्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी तसेच इतर सेवा यांची माहिती मिळण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens charter missing from government office ysh
First published on: 25-10-2022 at 00:02 IST