बोईसर : बोईसर परिसरातील एका सदनिकेमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत जवळपास अडीच कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

बोईसर मधील काटकर पाडा येथील कलरसिटी या गृह संकुलातील १७ क्रमांकाच्या इमारतीमधील एका सदनिकेमध्ये अंमली पदार्थ तयार केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पालघर युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संयुक्तरित्या सदानिकेमध्ये छापा टाकून १.२० किलो एमडी हा अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा जवळपास अडीच कोटीं रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून यामध्ये आणखी काही आरोपी सामील असल्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली.