भाईंदर : भाईंदरमध्ये दुरुस्ती कामादरम्यान घरातील स्लॅब कोसळून कंत्राटदार आणि कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरिराम चौहान (५५) आणि मखनलाल यादव (२६) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भाईंदर पूर्व येथील ‘श्री नाथ ज्योती’ या इमारतीच्या तळ मजल्यावर राहणाऱ्या विनय कुमार त्रिपाठी यांच्या घरी अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

या कामाचे कंत्राट त्यांनी हरिराम चौहान यांना दिले होते. दरम्यान रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हे काम सुरु असताना किचन मधील पाण्याच्या टाकीला लागून असलेल्या भिंतीचा स्लॅब अचानक खाली कोसळला. या ढिगार्‍याखाली कंत्राटदार हरिराम चौहान आणि कामगार मखनलाल यादव व आकाश यादव अडकले होते. याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच जवानांनी तिघांना ढिगार्‍यातून काढून रुग्णालयात हलवले. मात्र यात हरीनाम चौहान आणि मखनलाल यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. तर आकाश यादव हा यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Crime News Delhi
IRS ऑफिसरची ‘हेट स्टोरी’, फ्लॅटमध्ये आढळला प्रेयसीचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक; नेमकं काय घडलं?
man shoots dj oprator in ranchi,
धक्कादायक! मद्य न दिल्याने थेट बारमधील डीजे ऑपरेटरच्या छातीत झाडल्या गोळ्या; जागीच मृत्यू
children hospital fire new born baby dies
‘बेबी केअर सेंटर’ लागलेल्या आग प्रकरणात धक्कादायक खुलासे; त्या रात्री नक्की काय घडलं?
man inhuman torture to his wife in Pimpri-Chinchwad is arrested by police
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Ghatkopar hoarding collapse
नवजात बालकांचे छत्र हरपले; सचिन यादव, दिलीप पासवान यांचा झाला मृत्यू
Clashes between protesters and police in Pakistan occupied Kashmir last week
पीओके’त हिंसक आंदोलन; निदर्शकांशी संघर्षात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जखमी
10-Year-Old Dies After Consuming Maggi
‘मॅगी’सह भात खाल्ल्यानंतर १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबातील इतरांनाही विषबाधा
strome in delhi
वादळामुळे दिल्लीत तीन ठार; झाडे, विजेचे खांब, भिंत पडल्याने दुर्घटना

हेही वाचा : दुचाकी अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, मिरा रोड येथील घटना; दुचाकीस्वार मित्रावर गुन्हा दाखल

संरचनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश.

भाईंदर मधील इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेतील इमारत ही पाच मजली असून ती फारच जुनी झाली आहे. त्यामुळे इमारतीचा संरचनात्मक अहवाल काढण्याचे आदेश मिराभाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी दिले आहेत.