वसई : दिवाळीला लावलेला आकाशकंदील काढताना तोल जाऊन पडल्याने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे ही घटना घडली. श्रेया सिंग (२१) ही तरुणी विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील बचराज लॅण्डमार्क या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आपल्या कुटुंबियांसमेवत रहात होती.

हेही वाचा : नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळी निमित्त सिंग कुटुंबियांनी आपल्या घराच्या गॅलरीत आकाशकंदिल लावला होता. बुधवारी रात्री ती गॅलरीत लावलेला आकाशकंदिल काढत होती. त्यावेळी तिचा तोल गेला आणि ती ११ व्या मजल्यावरून खाली पडली. तिला उपचारासाठी विरारच्या संजिवनी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बोळींज पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.