वसई: विरार जवळील अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनारी मृत अवस्थेत व्हेल मासा आढळून आला आहे. जवळपास २५ फुट लांबीचा हा व्हेल मासा आहे. विरार पश्चिमेच्या भागात समुद्रात अर्नाळा किल्ला परिसर आहे. सोमवारी अर्नाळा किल्ल्याच्या दक्षिणेला हनुमंत बुरूजाच्या खाली आढळून आला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

हेही वाचा : विवाहबाह्य संबंधांतून विरारमध्ये महिलेची हत्या, प्रियकरावर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरतीच्या वेळेस हा मासा वाहून समुद्र किनाऱ्यावर आला असून त्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. मागील दोन दिवस झाले हा मासा मृत होऊन आल्याने त्याची दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरात पसरू लागली आहे. हा मासा या भागातून हलवून त्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.