वसई: मिरा रोड मध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सागर अथनीकर (वय २३) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. ते मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत होते.

हेही वाचा : शहरबात…. सुक्षिशित असलेले ‘अशिक्षित’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागर अथनीकर हे आपल्या एका सहकाऱ्यासह मिरा रोड मधील अपना घर या संकुलात राहत होते. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरात कोणी नसताना सागर यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरगुती वादातून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.