वसई: सोडून गेलेल्या बायकोला धडा शिकवण्यासाठी एका इसमाने चक्क दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. मात्र नालासोपारा येथील पेल्हार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला शोधून त्यांच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षावर एक निनावी दूरध्वनी आला होता. फोन करणाऱ्या इसमाने दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली.

हा फोन नालासोपारा परिसरातून आला होता, त्यामुळे पेल्हार पोलिसांनी याचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी तसेच पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे यांनी रातोरात तांत्रिक विश्लेषण करून तपासाला सुरुवात केली. आरोपीचा मोबाईल क्रमांक बंद होता. पोलिसांनी या फोनची माहिती काढली असता ओम शिवसाई चाळ एवढाच पत्ता मिळत होता. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने रातोरात परिसरातील सर्व ओम शिवसाई नावाच्या चाळी पालथ्या घातल्या. दरम्यान सीसीटीव्ही मध्ये एक संशयित पोलिसांना दिसला. त्यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले आणि त्याला नालासोपारा येथील बिलालपाडा मधून अटक केली.

vasai virar municipality, development plan, problems, funds, reservation land city, 2021 to 2041, announce, survey, geographical standard, may 2024, challenges, marathi news, maharashtra,
वसई : शहराची नव्याने रचना करताना..
Sudhir Singh murder case
सुधीर सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक, उत्तर प्रदेशच्या जंगलात पेल्हार पोलिसांचा थरारक पाठलाग
kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
24 hours water supply stop to Kalyan-Dombivli Taloja and Ulhasnagar
कल्याण-डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद

हेही वाचा : सुधीर सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक, उत्तर प्रदेशच्या जंगलात पेल्हार पोलिसांचा थरारक पाठलाग

बायकोला धडा शिकवण्यासाठी केला कॉल

आरोपी विकास शुक्ला (३५) हा मजुरीचे काम करतो. दीड वर्षापूर्वी त्याची बायको त्याला सोडून कल्याण येथे रहायला गेली होगी. ती कामानिमित्त कल्याण ते दादर असा प्रवास करत होती. त्यामुळे बायकोला धडा शिकवण्यासाठी त्याने कल्याण आणि दादर रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवून देण्याची धमकी दारूच्या नशेत दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.