वसई : विरारमध्ये बसच्या धडकेत मरण पावलेल्या सिध्दी फुटाणे या तरुणीचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे. दु:खाच्या प्रसंगातही तिच्या पालकांनी संयम ठेवून हे सामाजिक दातृत्व दाखवले आहे. सिध्दी या जगात नसली तरी डोळ्यांच्या रुपाने ती जिवंत राहून दृष्टीहिनांच्या आयुष्यात प्रकाश बनणार आहे. सिध्दी फुटाणे (१९) ही तरुणी विरारच्या गोपचपाडा येथे रहात होती. मंगळवारी नरसिंह गोविंद वर्तक या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल जाणार होती. या शाळेत सिध्दीचा लहान भाऊ ओम पाचव्या इयत्तेत शिकतो. सिध्दी त्याला सोडायला शाळेत गेली होती.

सहलीसाठी शाळेच्या एकूण ११ बसेस निघाल्या होत्या. सिध्दीने भावाला बस मध्ये बसवून निरोप दिला. मात्र बस क्रमांक (एमएच ४७ ए एस ३८३४) ही मागे वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि भितींजवळ उभ्या असलेल्या सिध्दीला चिरडले. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. तिला विरारच्या संजिवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या अपघाती मृत्यूमुळे तिच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी खचून न जाता आई अश्विनी आणि वडील अनिल फुटाणे यांनी आपल्या लाडक्या मुलीचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.

Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल
Sita Soren and kalpana soren
झारखंडमध्ये जेएमएम पक्षात कौटुंबिक कलह? एका सुनेला बढती मिळाल्याने दुसऱ्या सुनेचा भाजपात प्रवेश

हेही वाचा : वसई : नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मालवाहतूक वाहनांना भीषण आग

देहमुक्ती मिशनचे पुरूषोत्तम पवार यांनी याकामी सहकार्य केले. शवविच्छेदन, पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रियेत वेळ निघून जात होता. परंतु सिध्दीचा भाऊ सचिन आणि त्याचा मित्र साकीब शेख यांनी प्रत्येक सुचनांचे पालन करून वेळेत प्रक्रिया केली आणि सिध्दीच्या दोन्ही डोळ्यांचे दान केले. त्यामुळे सिध्दी या जगात नसली तरी तिच्या डोळ्यांनी ती दोन अंधांच्या आयुष्यात प्रकाश देऊन त्यांच्या रुपाने जग पाहणार आहे. सिध्दीचे शालेय शिक्षण याच शाळेत झाले होते. सध्या ती कम्प्युटर सायन्सच्या पदविकेच्या शेवटच्या वर्गात शिकत होती. तिची आई गृहीणी आहे तर वडील हे मुंबई पोलिसांच्या शस्त्रास्र विभागात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा : अखेर महानगर पालिकेच्या पाणीपट्टी दराचे समानीकरण; कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीनंतर पालिकेला जाग

ठेकेदार, शाळेची चौकशी करणार

या घटनेची सखोल चौकशी विरार पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांनी चालकाला कलम ३०४ (अ), २९७, ३३७. ३३८ तसेच मोटर वाहतूक कायद्याच्या कलम १८४ अन्वये अटक केली आहे. बुधवारी त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. नरसिगं गोविंद वर्तक शाळेने स्वाती ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीकडून सहलीसाठी ११ बसेस भाडेतत्वावर घेतल्या होत्या. यासंबंधीचा करार, शाळेची भूमिका ठेकेदाराने नियमांचे पालन केले होते की नाही याचा तपास केला जाणार असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबे यांनी सांगितले. या घटनेमुळे आम्ही प्रचंड दु:खात आहोत. या प्रकऱणी आम्ही सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना दिले असून तपासात जे काही सहकार्य लागेल ते करण्यास तयार आहोत असे शाळेचे विश्वस्त विकास वर्तक यांनी सांगितले.