वसई : मालगाडीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत चालक जखमी झाला आहे. रविवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या वैतरणा आणि विरार रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. वसई रोड रेल्वे पोलीस दगडफेक करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत रविवारी एक मालगाडी (गूडस् ट्रेन क्रमांक यूएनजीयू-केटीआयजी) गुजरातच्या बलसाड रेल्वे स्थानकापासून विरारच्या दिशने येत होती. या मालगाडीत सुप्रिया अरविंद परोहा हे लोकोपायलट आणि शिंभू दयाल मिना असे सहाय्यक लोको पायलट होते.

गाडी वैतरणा रेल्वे स्थानकाहून संध्याकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटली. गाडी काही अंतर पुढे जाताच एका अज्ञात इसमाने गाडीवर दगड फेकून मारला. हा दगड इंजिनच्या काचेला लागून सहाय्यक लोको पायलट शिंभू मिना यांच्या गळ्याला लागला. तसेच काचेचे तुकडे उडून त्यांच्या ओठांना लागल्याने ते जखमी झाले आहेत.

हेही वाचा : मीरा बोरवणकरांनी अजित पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांना तात्काळ वसईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ‘आम्हाला वाटलं की तो इसम रूळ ओलांडेल मात्र तो तिथेच थांबला आणि त्याने साधारण २० ते २५ मिटरच्या अंतरावरून हेतूपुरस्सर दगड फेकून मारला. त्याचे वय साधारणत: तिशीच्या दरम्यान होते’, अशी फिर्याद लोको पायलट सुप्रिया परोहा यांनी वसई रोड रेल्वे पोलिसांना दिली आहे. लोकोपायलट परोहा यांच्या तक्रारीवरून वसई रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात भारतीय रेल्वे अधिनियम १९८९ कलम १५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.