वसई : दाताला लावलेली कॅप काढण्यासाठी डॉक्टरांकडे गेलेल्या महिलेचा दातच काढण्यात आल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. या डॉक्टरच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पीडित महिला सुनिता यादव (३५) ही सप्टेंबर महिन्यात नालासोपारा येथील मौर्या फॅमिली केअर ॲण्ड डेंटल क्लिनिक या दवाखान्यात दाताच्या उपचारासाठी गेली होती.
हेही वाचा : श्रीमंतांना फसवणार्या ‘हनी ट्रॅप’ टोळीचा पर्दाफाश, फेसबुकवरून मैत्री आणि कोट्यावधींची वसुली
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दाताला लावलेली कॅप काढताना दंतवैद्यक डॉ. स्वतंत्रता मौर्या यांनी फिर्यादी यादव यांचा मूळ दातच काढून टाकला. त्यामुळे यादव यांनी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आचोळी पोलिसांनी तपास करून शुक्रवारी निष्काळजीपणा केल्याबद्दल डॉ. मौर्या यांच्यावर कलम ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.