वसई: वसई पूर्वेच्या पोमण येथे अनधिकृत गोदामाचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नायगाव पूर्वेच्या साष्टीकर पाडा येथे एका अनधिकृत गोदामाचे बांधकाम सुरू होते. यावेळी अकरा मजूर काम करत होते. अचानक गोदामाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोन कामगार ढिगार्‍याखाली कोसळले. त्यामध्ये आकाश टिकोरीलाल गौतम (२१) या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचा चुलत भसियानंद गौतम हा जखमी झाला. त्याच्यावर सातिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : पालघर मध्ये बविआ निवडणूक लढवणार, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठेकेदार प्रभू कडव याने कामगारांना कुठल्याही सुरक्षेची साधने पुरवली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर नायगाव पोलीस ठाण्यात कलम ३०४ अ, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बांधकाम अनधिकृत असून त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसिलदारांकडे तक्रार केली आहे अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी महेश बोडके यांनी दिली.