वसई : विरारमध्ये एका इमारतीच्या बेडरूम मधील छताचा स्लॅब अंगावर पडल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील सी. एम. नंगर येथे दादू प्लाझा इमारत आहे. ही इमारत १० वर्ष जुनी आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील १०२ क्रमांकाच्या सदनिकेत पवार कुटुंबिय राहतात.
हेही वाचा : आज जागतिक व्हिगन दिन : व्हिगन शैलीकडे वाढता कल, व्हिगन कॅफेची संख्याही वाढली
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरात बेडरूमधील छताच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत बेडरूममध्ये झोपलेली शितल पवार (३४) जखमी झाली. तिला उपचारासाठी पालिकेच्या चंदनसार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शितलचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.