वसई:- विरार पूर्वेकडील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चिंचेचे झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

वसई-विरार शहरात सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. शहराच्या अनेक ठिकाणी पावसाचा फटका बसला असल्याचे पाहायला मिळाले. त्यातच विरार पूर्वेकडील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलाच्या मुख्य प्रवेश दारावर झाड कोसळण्याची घटना सोमवारी दुपारी १२ सुमारास घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावर निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन जवान घटनास्थळी पोहोचून कटरच्या सहाय्याने चिंचेची झाड बाजूला केले तसेच प्रवेशद्वाराचा सांगाडा बाजूला करण्यात आले आहे. शाळा सुटण्याच्या वेळेतच अचानक झाड कोसळल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळा सुटण्या आधीच ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे