बोगस डॉक्टरांविरोधात जनमत प्रक्षुब्ध

वसई : शहरात सक्रिय असणारे बोगस डॉक्टर, त्यांना पाठीशी घालणारी महापालिकेची यंत्रणा आणि या प्रकरणाचा पोलिसांचा संशयास्पद तपास याविरोधात जनमत प्रक्षुब्ध होऊ लागले आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून तो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) द्यावा, तसेच तक्रार देऊनही बोगस डॉक्टरांवर कारवाई न करणाऱ्या पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी विविध पक्षांनी केली आहे. सुनील वाडकर १४ वर्षांपासून डॉक्टर म्हणून वावरत होता. त्यापैकी वसई नगर परिषदेत २ वर्षे आणि वसई-विरार पालिकेत ५ वर्षे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून वावरत होता. वाडकर याचे काळे धंदे ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणले होते. त्याला गुन्हे शाखेने अटक करून पुढील तपास विरार पोलिसांकडे सोपवला आहे. ज्याच्या नावाचा परवाना वाडकर वापरत होता ते डॉ. सतीश मणी कुठे आहेत? वाडकरने दिलेले संशयास्पद मृत्यू प्रमाणपत्र, मान्यता दिलेली रुग्णालये, केलेल्या कारवाया हे सारे संशयास्पद असून पोलिसांनी त्याचा शोध घेतलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) द्यावा, अशी मागणी शिवसेना वसई उपतालुकाप्रमुख अतुल पाटील यांनी केली आहे. आप पक्ष तसेच युवक काँग्रेसनेदेखील हा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केली आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
no permission for fodder camps to curb corruption
यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय? 
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

डॉ. पाटील यांच्या बडतर्फीची मागणी

वसईत अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या हेमंत पाटील याच्यावर वसई पोलिसांनी बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्याच्याविरोधात दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या डी. एम. पेटीट रुग्णालयातील प्रभाग समिती आयचे आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र दोन वर्षे त्यांनी काहीच कारवाई न करता पाटील याला पाठीशी घातल्याचा आरोप तक्रारदार तसनिफ शेख यांनी केला आहे. त्यामुळे डॉ. वसंत पाटील यांना बडतर्फ करण्याची मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.