वसई:- तीन वर्षांपूर्वी मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका तरुणाचा झालेला अपघात हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापणे येथे वकील इद्रीसी (२७) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी विरार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासामध्ये हा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचे उघड झाले आहे. पोखन साव (५०), इम्रान सिद्दीकी (२७) आणि अब्दुल शाह (२३) या तिघांनी मिळून ही हत्या केली आहे.

हेही वाचा – वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात

मुख्य आरोपी पोखन साव याचे मयत वकील इद्रीसी याच्या पत्नीबरोबर अनैतिक संबध होते. त्यामुळे या प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या वकील इद्रीसी याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी विरार पोलिसांनी रविवारी रात्री दोन जणांना हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

हेही वाचा – वसईचे माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांचे ९३ व्या वर्षी निधन

अपहरण करून केली हत्या

आरोपींनी मयत वकील इंद्रिसी याला बळजबरीने रिक्षात बसवून महामार्गावर नेले. तेथे त्याला मारहाण करण्यात आली आणि मानेत दुचाकीची चावी घुसवून त्याची हत्या करण्यात आली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It has been revealed that accident of youth on mumbai ahmedabad highway was not a natural death but a murder ssb
First published on: 08-04-2024 at 11:37 IST