वसई- नालासोपारामधील द्वारका रुग्णालयाला लागेलल्या आगीप्रकरणी अखेर ४ दिवसांनी आचोळे पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. रस्ता खोदताना हलगर्जीपणा केल्याने गॅसपाईपलाईन पुटल्याने आग लागल्याचे स्पष्ट झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार ३० एप्रिल रोजी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील द्वारका हॉटेलला आग लागली होती. या आगीत सिलेंडरचा स्फोट होऊन हॉटेल जळून खाक झाले होते. तर हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहक मिळून ८ जण जखमी झाले होते. या हॉटेलच्या समोरील रस्त्यावर गटारीसाठी खोदकाम सुरू होते. मात्र ते काम चुकीच्या पद्धतीने सुरू होते. मंगळवारी साडेतीनच्या सुमारास काम सुरू असताना जेसीबीने रस्ता खणताना गॅसपाईपलाईन फुटली आणि हॉटेलमध्ये आग लागली होती. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी जेसीबीचालक, रस्त्याचे काम करणारा ठेकेदार यांच्या विरोधात हलगर्जीपणे काम करून मानवी जीवास धोका उत्पन्न केल्याचा ठपका ठेवला आहे.

हेही वाचा – पालघरमधून शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट? उद्या भाजपाचे संभाव्य उमेदवार अर्ज भरणार

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर आचोळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार ठेकेदार, जेसीबीचा चालक यांच्यासह अन्य जणांविरोधात कलम २८५, ३३६, ३३७, ३३८, ४२७ सह भारतीय वीज नियामक अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – परदेशात नोकरीच्या आमिषाने दिडशे तरुणांची फसवणूक, नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे, गटारीचे काम योग्य पद्धतीने होत नसून यामुळे परिसरातील इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आचोळे पोलिसांनी दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वीच दिला होता.