वसई– नालासोपारा येथील एका शाळेत बाँम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शाळा रिकामी केली असून शाळेची तपासणी करण्यात येत आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे ब्लूंमीग बग नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सोमवारी दुपारी शाळेत एक निनावी दूरध्वनी आला. शाळेतील एका विद्यार्थ्याच्या दप्तरात बॉम्ब ठेवला असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. यामुळे एकच खळबळ उडाली.

हेही वाचा >>> फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्‍यांना बाहेर काढून शाळा रिकामी करण्यात आली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घऱी पाठविण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आम्ही या तपासणी करत आहोत आहोत. सर्व मुले सुरक्षित आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी केले आहे.