वसई- नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्यांचा सर्वोत्कृष्ट तपास कऱणार्‍या आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात निवडणूक काळात शस्त्रसाठा पकडणारे गुन्हे शाखा २ तसेच बेकायदेशीर मोबाईल नेटवर्कचा  चालवणार्‍या टोळीचा छडा लावणार्‍या गुन्हे शाखा ३ चा समावेश आहे. निवडणुकीत दिड कोटींची बेहिशोबी रोकड जप्त करणार्‍या नयानगर पोलिसांनाही गौरविण्यात आले.

हेही वाचा >>> ४१ अनधिकृत इमारती बांधणारा भूमाफिया सक्रीय; नायगाव पुन्हा बेकायदेशी चाळींचे काम सुरू

दर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलिसांना आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट तपासाच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपासाचे पुरस्कार विविध पोलिसांना प्रदान करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घातपात घडविण्यासाठी रचण्यात आलेला कट गुन्हे शाखा २ च्या पथकाने उधळून लावला होता. पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून ९ देसी पिस्टल, २१ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करून ८ जणांना अटक केली होती. या कामागिरीबद्दल गुन्हे शाखा २ चे प्रमुख शाहूराज रणवरे यांना उत्कृष्ट तपासाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने समांतर बेकायदेशीर मोबाईल नेटवर्क उघडकीस आणले होते. मोबाईल टॉवरमधून रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावण्यात येणारे यंत्र (आझना कार्ड) चोरी करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टोळीला अटक करण्यात आली होती. या यंत्राचा वापर परदेशातून गुन्हेगारी कृत्यासाठी करण्यात येत होता. या तपासाबाबत गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना गौरविण्यात आले.

हेही वाचा >>> गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक

अन्य पुरस्कार विजेते पोलीस अधिकारी

राहुल राख (मध्यवर्ती गुन्हे शाखा) – भर रस्त्यात चॉपरचा धाक दाखवून करण्यात आलेल्या १३ लाखांच्या दरोड्याची उकल

प्रमोद तावडे (तुळींज पोलीस ठाणे)- २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सोनसाखळी चोरीचा तपास करून टोळीला अटक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाल वळवी (नालासोपारा)- वाहनांच्या काचा तोडून ऐवज चोरणाऱ्या टोळीचा छडा. ६ गुन्ह्यांची उकल अमर जगदाळे (नया नगर)- निवडणूक काळात दोन ठिकाणी कारवाई करून दिड कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त