लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार कैलास टेकवडे (४७) यांनी विरार येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते विरार मधील घरात एकटेच रहात होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

कैलास टेकवडे हे मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत होते. २००० मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले होेते. टेकवडे हे विरार पश्चिमेच्या जकात नाका येथील गार्डन कोर्ट इमारतीत एकटे राहते होते. पत्नी आणि मुले त्यांच्यासोबत रहात नव्हते. कांदिवली येथे राहणारा कैलास यांचे बंधून विलास २ जुलै पासून भावाला संपर्क करत होते. मात्र कैलास यांच्याकडून प्रतिसाद नव्हता. त्यामुळे गुरूवारी त्यांनी आपल्या मित्राला विरारच्या घरी बघण्यासाठी पाठवले होते. परंतु दार बंद होते. त्यामुळे शेजार्‍यांनी अर्नाळा सागरी पोलिसांना माहिती दिली.

आणखी वाचा-वसईतील घरांना सर्वेक्षणाच्या नावाखाली वाढीव घरपट्टी; आमदार राजेश पाटील यांचा विधानसभेत आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला असता कैलास टेकवडे यांचा मृदहेह हॉल मधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांनी आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. मागील दोन दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. टेकवडे यांचा मृतदेह शवविच्छेदनाच्या अहवालानंतर नेमकी वेळ स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.