वसई: सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते. या आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त शाळांना सुट्टी असल्याने अनेक नागरिक आपल्या मूळ गावी जात असतात. वसई विरार शहरातूनही मोठय़ा संख्येने नागरिक हे मूळ गावी जातात; परंतु कधी कधी एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये व रेल्वेतील गर्दी, याशिवाय काही वेळा आरक्षण मिळत नाही. त्यामुळे खासगी बसेसने प्रवास करतात; परंतु खासगी ट्रॅव्हलचे मालक प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारणी करून लूट करीत असतात. याआधी अशा तक्रारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या आहेत. खासगी बसचालकांना एसटीच्या भाडेदरापेक्षा दीडपट भाडे जास्त आकारण्याची मुभा आहे. असे असतानाही त्याहीपेक्षा अधिकचे भाडे घेतले जाते. याशिवाय मनमानीही सुरूच असते.

या प्रकाराला आळा घालण्यासाठी वसईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने खासगी बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. बुधवारपासून ही मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. यासाठी वायुवेग भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली.  ज्या ठिकाणी अतिरिक्त प्रवासी भाडे आकारले जात असेल अशा ठिकाणी कारवाई करण्यात येण्यात येणार आहे परवाना निलंबन यासह दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिला आहे. असेल त्यांची तक्रार ही परिवहन विभागाकडे करण्यात यावी, असे आवाहनही प्रवाशांना करण्यात येत आहे.

प्रवाशांची खासगी बसेसमार्फत होणारी लूट थांबविण्याच्या अनुषंगाने दिवाळीत विशेषत: तपासणी मोहीम सुरू केली आहे. जे यात दोषी आढळून येतील त्यांच्यावर परवाना निलंबन व दंडात्मक कारवाई केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई