भाईंदर :- भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस रेल्वे प्रशासनाने नवे सरकते जिने (एस्केलेटर) उभारले असून, त्यामुळे वयोवृद्ध, दिव्यांग तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.भाईंदर रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे. त्याअंतर्गत पश्चिम भागात नव्या सरकत्या जिन्याची उभारणी करण्यात आली असून, गुरुवारी हे जिने प्रवाशांच्या वापरासाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले.

यापूर्वी पश्चिम भागात सरकते जिने उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना जिन्यांने चढ उतार करून प्रवास करावा लागत होता. विशेषतः वयोवृद्ध आणि अपंग प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी, अपंगांसाठी असलेल्या लिफ्टचा वापर सर्वसामान्य प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात केला जात होता.मात्र, नव्या सरकत्या जिन्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. हे जिने खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आले असल्याचा दावा  शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला  आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिजिटल व्यवहारावर अधिक भर:-

रेल्वे प्रशासनाने मागील काही महिन्यात डिजिटल व्यवरावर अधिक भर देणारे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे भाईंदर रेल्वे स्थानकावर तिकीट घर येथे बऱ्याच तिकीट मशीन उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय आता तिकीट घरातील एक खिडकी  रोख रक्कमे साठी तर अन्य खिडक्यांवर यूपीआय द्वारे व्यवहार केला जात आहे.