वसई पूर्वेच्या वाघरळपाडा येथील एका चाळीतील घरावर आज सकाळी दरड कोसळल्याने दोन जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत. त्यांना ढिगार्‍यातून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घरात अमित सिंग (४५) पत्नी आणि २ मुलांसह राहत होते. दरम्यान, आज सकाळी साडेसातच्या सुमारास पावसामुळे चाळीवर दरड कोसळली. स्थानिकांच्या मदतीने आई वंदना सिंग (४०) आणि मुलगा ओमसिंग (१२) यांना बाहेर काढण्यात आले. अद्यापही वडील अमित सिंग आणि त्यांची मुलगी रोशनी सिंग (१६) हे ढिगाराखाली अडकले आहेत. आम्ही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करत असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती वसई विरार अग्निशमन विभाग प्रमुख दिलीप पालव यांनी दिली

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The father and daughter were trapped under a pile of rubble on the house in vasai msr
First published on: 13-07-2022 at 09:39 IST