वसई विरारसह मुंबई आणि ठाणे परिसरात चोर्‍या करणार्‍या एका अवलिया चोरास माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. या चोराने तब्बल ६५ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. वसईच्या शास्त्रीनगर येथील एका घरफोडीचा तपास माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करत होते.

हेही वाचा >>> आजरपणानंतर हितेंद्र ठाकुरांचा प्रचार सुरू, वसईत सामाजिक सलोखा कायम ठेवल्याचा दावा

Tesla Cybertruck joins Dubai Police fleet
दुबई पोलिस चालवणार Tesla Cybertruc; पोर्श, फेरारी सारख्या गाड्या आहेत त्यांच्या ताफ्यात
kannada actor darshan arrested in murder case
कन्नड अभिनेता दर्शनला हत्येप्रकरणी अटक; बंगळूरु पोलिसांच्या कारवाईनंतर सहा दिवसांची पोलीस कोठडी
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…
Porsche Teen's Blood Sample Thrown Into Dustbin
Pune Accident: रक्ताचे नमुने कचराकुंडीत; सदोष रक्त चाचणी निकाल बदलू शकते का? सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन केसमध्ये हायकोर्टात नेमके काय घडले होते?
Controversial career of Dr. Ajay Tavare in Sassoon Hospital
ससूनमधील डॉ. अजय तावरेंची वादग्रस्त कारकिर्द; मूत्रपिंड रॅकेटपासून आमदाराच्या शिफारसपत्रापर्यंत…
judge dog stolen
न्यायाधीशांच्या घरातून श्वानाची चोरी झाल्याचा आरोप; तब्बल २४ जणांवर गुन्हा दाखल; कुठे घडला प्रकार?
Pune porsche accident, Pune porsche car accident latest updates
पुण्यातला अपघात हा तिहेरी गुन्हाच; पण त्यामागे काय काय आहे?
Harassment Case Brijbhushan Sharan Singh
“मी गुन्हा केलाच नाही, तर गुन्ह्याची कबुली…”; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया

या वेळी सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत आतिष साखरकर (३६) याला अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीमधील १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील काही वर्षांपासून तो चोर्‍या करत आहे. त्याने यापूर्वी ५७ चोर्‍या केल्या होत्या तर त्याच्या अटकेनंतर वसईतील माणिकपूर, मुंबईतील एमएचबी, विलेपार्ले, जुहू आणि गुजराथ मधील उमरगाव पोलीस ठाण्यातील ५ चोर्‍या उघडकीस आल्या आहेत. आतापर्यंत त्याने एकूण ६५ चोर्‍या केल्याचे उघडकीस आल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) पूर्णिमी चौगुले यांनी सांगितले. यापुर्वी देखील त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंत तो पुन्हा चोर्‍या करायचा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक संतोष चौधरी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौदरी, गोविंद लवटे आदींच्या पथकाने या अवलिया चोराला पकडण्यात यश मिळवले.