scorecardresearch

वसई : वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट ; तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी

या झालेल्या स्फोटात कारखान्यात काम करण्यासाठी असलेले बारा कामगार होरपळले.

वसई : वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट ; तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी
नायगाव पूर्वेच्या  वाकीपाडा येथे कॉस पावर  कारखान्यात बॉयलरचा स्फोट

नायगाव पूर्वेच्या  वाकीपाडा येथे कॉस पावर  कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात नायगाव पूर्वेच्या जूचंद्र वाकीपाडा येथील भागात कॉस पावर नावाचा कारखाना आहे.  बुधवारी अचानकपणे स्फोट होऊन  भीषण आग लागल्याची घटना घडली.

या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तर  पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

या झालेल्या स्फोटात कारखान्यात काम करण्यासाठी असलेले बारा कामगार होरपळले. यातील सात जण जखमी झाली आहेत.  वैष्णवी , भावेश, जयदीप राव , सागर , हर्षला व अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना बाहेर काढून  उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत.

तर अजय व अन्य दोन जणांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी पाठविले आहेत. तसेच याप्रकरणी वालीव पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. या स्फोटाची भीषणता इतकी होती की त्याचे हादरे आजूबाजूच्या परिसराला बसले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या