वसई : नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करीत ट्रक चालकांनी सोमवारी सकाळच्या सुमारास चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनकर्त्यांना बाजूला करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नुकताच केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. यात अपघात घडल्यास वाहनचालकास दहा वर्षांची शिक्षा व दंड ठोठावला जाणार आहे. परंतु कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदीवर ट्रक चालक व इतर मालवाहतूक चालक यांनी आक्षेप घेतला आहे. “वर्षानुवर्षे आम्ही वाहनचालकांचे काम करीत आहोत. त्यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. जर अपघात प्रकरणी अशी शिक्षा झाली तर आम्ही करायचे काय आणि जगायचे तरी कसे? कोणी मुद्दाम अपघात करीत नाहीत कधी अनावधानाने एखादी घटना घडते. त्यामुळे इतकी मोठी शिक्षा देणे चुकीचे आहे”, असे आंदोलक ट्रक चालकांनी म्हटले आहे.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!

हेही वाचा : वसईत लोकल ट्रेनमध्ये बेवारस बॅगेमुळे भिती; बॉम्ब असल्याची अफवा

या कायद्याविरोधात वसई विरार भागातील सर्व ट्रक चालकांनी एकत्र येऊन सोमवारी नवीन वर्षाच्या सुरूवातीला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी येथे आंदोलन करून महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळे निर्माण होऊन प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

हेही वाचा : वसई: आदिवासी कातकरी वेठबिगार कामगारांची छळवणूक

यामुळे नागरिकांचेही हाल झाले आहेत. याशिवाय आंदोलनकर्त्यांना समज देण्यासाठी गेलेल्या नायगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण होते. महामार्ग वाहतूक पोलीस व नायगाव पोलीस यांच्या मार्फत आंदोलनकर्त्यांना आवरून वाहतूक सुरळीत करण्यात आली.