भाईंदर : पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी भाईंदरच्या बंदरवाडी परिसरात ही घटना घडली. दुर्गा देवी बिष्ट (५८ ) असे या अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली.

गुरुवारी दुपारी दुर्गादेवी बिष्ट या भाईंदर पूर्वेच्या बंदरवाडी नाक्याजवळ बससाठी उभ्या होत्या. त्यावेळी आलेल्या परिवहन सेवेच्या बसने त्यांना धडक दिली, त्यामुळे बिष्ट यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना घडताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा…मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे मागितली पाच लाखांची खंडणी, भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतप्त नागरिकांनी बसची मोडतोड केली. नवघर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू असल्याची माहिती नवघर वरिष्ठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे.