वसई- एका अल्पवयीन तरुणीकडून चुकून लागलेला कॉल चांगलाच महागात पडला आहे. या कॉलचे निमित्त साधून एका तरुणाने तिला फसवून तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. बोळींज पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

पीडित तरूणी सध्या १८ वर्षांची असून विरार येथे राहते. मागील वर्षी मे महिन्यात पीडित तरूणी १७ वर्षांची असताना तिच्याकडून एका अनोळखी क्रमांकावर चुकून फोन लागला. पलिकडे शुभम कोळी (२४) मुंबईच्या ग्रॅंट रोड येथे राहणारा तरूण होता. त्या चुकून लागलेल्या कॉलचे निमित्त करून शुभमने पीडित तरुणीशी ओळख वाढवली. तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्याशी मैत्री केली आणि तिच्या घरी येऊन तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मात्र शुभम तिला फसवत असल्याचे पीडित तरुणीच्या लक्षात आले. तिने मग बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा >>>वसई : मोबाइलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार, नायगाव कोळीवाड्यातील स्मशानभूमीची दुरवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीवरून बोळींज पोलिसांनी शुभम विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरंक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) च्या कलम ४, ८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती या प्रकऱणाचा तपास करणारे बोळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी यांनी सांगितले