v2

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल

* माझ्या आईचे मुंबई येथे घर आहे. मात्र वडील नाहीत. मी एकुलती एक मुलगी आहे. मला असे विचारायचे आहे की, माझ्या आईच्या पश्चात जर मला घर माझ्या नावावर करायचे असल्यास मला रजिस्ट्रेशन चार्जेस स्टॅम्प डय़ुटी आणि सोसायटीला ट्रान्स्फर फी भरावी लागेल का? माझ्या आईने माझे नॉमिनेशन केले आहे.

ऋतुजा जोशीडोंबिवली ().

* सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की आपण जर आपल्या आईचे घर तिच्या हयातीत आपल्या नावावर करून घेणार असाल, तरच स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन, हस्तांतरण फी आदी सर्व पैसे भरावे लागतील. तुमच्या आईच्या पश्चात वारसा हक्काने तुम्हाला त्या जागेची मालकी वारसा हक्कानेच मिळेल. त्यासाठी काही करायची जरूर नाही. आपल्या नावाचे नॉमिनेशन तर आपल्या आईने केलेलेच आहे. त्यामुळे तोही प्रश्न उरला नाही. जर गृहनिर्माण संस्थेत कोणी या हस्तांतरणाला हरकत घेतली नाही तर हे हस्तांतरण सहज होऊन जाईल. जर वारसा हक्काबद्दल वाद उत्पन्न झाल्यास गृहनिर्माण संस्था आपणाकडे वारसा दाखल्याची (सक्शेशन सर्टिफिकेटची) मागणी करू शकेल. आपल्या आईने इच्छापत्र (मृत्युपत्र) बनवून ठेवल्यास  बरे होईल.

* मी २००१ साली १ गुंठा जागा घेतली. सदर जागेचे खरेदीखत होत नाही म्हणून रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर मालकाकडून जागा विकण्याचे लिहून घेतले. त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्य़ा घेतल्या. सदर जमीन शेतजमीन होती. ती मी २००४ साली वस्तीपड करून घेतली. त्या जागेवर मी पाया बांधला. त्याच वर्षी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून त्या जागेची रीतसर नोंद करून घेतली. सन २००५ पासून आजपर्यंत मी त्या जागेचा कर भरत आहे. आता ज्याच्याकडून जागा विकत घेतली ती व्यक्ती तुम्ही रीतसर खरेदीखत केले नाही म्हणजेच ती जागा तुमची नसून आमची आहे असे म्हणू लागले, कृपया मार्गदर्शन करावे.

जालिंदर मोहन साबळे, कर्जत.

* खरे तर कोणतेही कागदपत्र न पाहता अशा प्रश्नांची उत्तरे देणे बरोबर नाही. तरीसुद्धा आपण दिलेली माहिती सत्य आहे असे धरून उत्तर द्यायचे झाल्यास आपण ती जागा बिनशेती करून घेतली असावी असे वाटते. आणि सदर बिनशेती परवानगी आपल्या नावे असेल तर आपल्याला काही काळजी करायचे कारण नाही. आपण जागेवरील ताबा सोडू नये. ग्रामपंचायतीचा कर नियमितपणे भरत जावे व समोरच्या व्यक्तीला सांगावे, की आपणाला जर आपली बाजू खरी वाटत असेल तर आपण सक्षम अशा न्यायालयाकडून तसा आदेश आणावा, म्हणजे मग त्याबाबत मी विचार करीन. याबद्दल आपल्याकडील सर्व कागदपत्र एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला भेटून त्याला दाखवून त्याच्या सल्ल्याप्रमाणे कृती करावी.