गौरी प्रधान

विजेचा शोध लागणे हा मानवी जीवनातील अत्यंत मोलाचा क्षण मानला पाहिजे. एक कळ दाबताच घरभर उजेड पडण्यापासून ते थेट कपडे धुणे, भांडी घासून होणे किंवा वाटण वाटणे अशी अनेकविध कामे एका बोटाच्या इशाऱ्यावर होणे हा चमत्कार केवळ विजेमुळेच शक्य झाला आहे. आज तर विजेशिवाय मानवी जीवनाचा आपण विचारही नाही करू शकणार. ही वीज आज माणसाची मूलभूत गरज झाली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

याच कारणाने घराचे इंटिरिअर डिझाइन करत असताना इलेक्ट्रिकल लेआउट हा फíनचर लेआउटइतकाच महत्त्वाचा ठरतो. बरेच वेळा इलेक्ट्रिकल लेआउट हा तांत्रिकदृष्टय़ा क्लिष्ट दिसत असल्याने लोक इंटिरिअर डिझाइनरवर त्याची जबाबदारी टाकून मोकळे होतात. परंतु घराचे काम तुम्ही एखाद्या प्रशिक्षित इंटिरिअर डिझायनरकडून करून घ्या किंवा साधारण इलेक्ट्रिशिअनकडून, हे दोघेही तांत्रिक बाजू उत्तम सांभाळतीलही, परंतु तुमच्या गरजा मात्र तुम्हालाच सांगाव्या लागतील. कोणत्या खोलीत किती प्लग पॉइंट असावेत, किती खोल्यांत किती उजेड तुम्हाला आवश्यक वाटतो व त्याप्रमाणे किती लाइट खोलीत असावेत यात तंत्रज्ञाचा सल्ला आणि तुमची गरज दोन्हींची सांगड घातली तरच तुमच्या घरातील इलेक्ट्रिकचे काम समाधानकारक होऊ शकेल.

आपण आधीच म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिकचे काम करून घ्यायचे तर इलेक्ट्रिक लेआउट फार महत्त्वाचा. इलेक्ट्रिकचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच आपण आपल्याला हवे तितके आणि हवे तिथे पॉइंट्सची नोंद करू शकतो. उदा. बेडरूममध्ये किती लाइट हवेत, किती प्लग पॉइंट हवेत आणि कुठे कुठे हवेत हे आधीच ठरवून घ्या. वातानुकूलन यंत्र कुठे बसवणार या गोष्टी आधीच ठरलेल्या असतील तर पुढे काम करणे सोपे. इलेक्ट्रिकल लेआउटमुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते. ती म्हणजे, इलेक्ट्रिकल लेआउटची फíनचर लेआउटशी सांगड घातलेली असल्याने कोणतेही स्विच बोर्ड फíनचरच्या मागे लपले जात नाहीत. इलेक्ट्रिकल लेआउटआधी अभ्यास आणि चर्चा  करून बनवला जात असल्याने विनाकारण जास्तीचे किंवा गरजेपेक्षा कमी लाइट पॉइंट्स घेतले जात नाहीत आणि भविष्यातील डोकेदुखी टळते.

इलेक्ट्रिक लेआउट बनण्यापूर्वी तुमचे काम एकच- प्रत्येक खोलीत जाऊन तेथे तुमच्या इलेक्ट्रिकविषयक गरजांची यादी करणे. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो स्वयंपाकखोलीचा. सर्वात जास्त उपकरणांचा वापर हा स्वयंपाकखोलीत होतो. तिथे वापरात येणाऱ्या वस्तूंची तर योग्य यादी बनवावीच, पण त्याचसोबत स्वयंपाकाच्या ओटय़ावर एखाददोन जास्तीचे प्लग पॉइंटदेखील घेऊन ठेवावेत. म्हणजे, भविष्यात एखादे जास्तीचे उपकरण घ्यायचे म्हटले तरी अडचण व्हायला नको. बठकीच्या खोलीतदेखील सोफ्याजवळील कोपऱ्यात एखादा जास्तीचा प्लग पॉइंट स्विचसोबत स्कर्टिग लेव्हलला घेऊन ठेवावा, न जाणो पुढे कधी एखादा छानसा पोल लॅम्प घ्यावासा वाटलं तरी पॉइंट नाही म्हणून डिसपॉइंट व्हायला नको.

आता काम सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम घरात आपण किती वातानुकूलन यंत्र, किती क्षमतेचा फ्रिज, वॉिशग मशीन घेणार आहोत, शिवाय बाथरूममध्ये इन्स्टंट गिझर लावणार की जास्त क्षमतेचा बॉयलर घेणार, बाथरूममध्ये जाकुझी वैगेरेसारख्या सोयी घेणार का.. या गोष्टींची यादी बनवून घ्यावी. या यादीच्या साहाय्याने आपला तंत्रज्ञ आपल्याला किती फेजची वीज जोडणी लागेल याचा योग्य अंदाज बंधू शकेल. जर आपली वीज जोडणी कमी क्षमतेची असेल आणि आपण घरात वरील सर्व वस्तू वापरल्या तर आपली केबल तो भार सहन करू शकणार नाही आणि यातून अपघात घडण्याची शक्यता बळावेल.

घरात विजेचे काम करून घेताना सर्वप्रथम प्राधान्य द्यावे ते सुरक्षेला. याच कारणास्तव विजेच्या वायर्स घेताना त्या उत्तम दर्जाच्या आहेत आणि त्यावर सुरक्षा चिन्ह अंकित केलेले आहे याची खातरजमा करूनच घ्यावे. वायिरग करताना शक्यतो कन्सील वायिरगला प्राधान्य द्यावे. हे वायिरग तसे सुरक्षित. यात िभतीतून, जमिनीतून तसेच छतामधून वायर्स नेल्या जातात. परंतु त्यातदेखील वापरले जाणारे पाइप चांगल्या दर्जाचे आहेत याची खात्री करून घेणे चांगले; जेणेकरून ते आतल्या आत पाइप फुटून वायर्स उघडय़ा पडणार नाहीत. काही वेळा कन्सील वायिरगविषयी लोकांच्या मनात शंका असतात. जसं की- एकदा त्यात वायर टाकली की ती पुन्हा बदलता येते का? तर नक्कीच येते. कन्सील वायिरग हे फक्त सुरक्षित नाही तर वापरायला अतिशय सोपेदेखील आहे. एखादी वायर बदलायची किंवा नवी वायर टाकायची झाल्यास जुन्या पारंपरिक पद्धतीपेक्षाही हे जास्त सोपे आणि सुटसुटीत असते.

सुरक्षेचा आणखी एक भाग म्हणजे सíकट ब्रेकर्स. सुरक्षेसाठी जसं फ्यूज असतो त्याचप्रमाणे प्रत्येक महत्त्वाच्या उपकरणांसाठी घराच्या आत एक सíकट ब्रेकर बसवून घेणे केव्हाही योग्य. यालाच सामान्य भाषेत आपण ट्रिपर असेही म्हणतो. जेव्हा विजेचा भार अतिरिक्त वाढतो अशा वेळी हा ट्रिपर आपोआप खाली पडतो आणि आपल्या मौल्यवान उपकरणांकडे जाणारा वीजप्रवाह थांबवतो, जेणेकरून आपल्या उपकरणाचे नुकसान टळते.

सुरक्षेच्या आणि सोयीच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे इन्व्हर्टर. मुंबईसारख्या ठिकाणी याची फारशी गरज लागत नसली तरी जिथे विजेचा लपंडाव चालतो अशा ठिकाणी इन्व्हर्टर अतिशय गरजेचा. घरातील शक्यतो प्रत्येक खोलीतील एक पंखा आणि एक लाइट तसेच फ्रिज इन्व्हर्टरशी जोडून घ्यावे, म्हणजे लाइट गेली तरी चिंता नको.

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com