मोहन गद्रे

मोठा भूभाग, लहान टेकडय़ा सपाट करून मिळालेली मोठी जमीन, खाजणे बुजवून मिळवलेली जमीन अशी कुलाब्यापासून ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि पश्चिम उपनगरात दहिसपर्यंत आता सर्वत्र गगनभेदी उंचीच्या फक्त रहिवासी इमारती एकापाठोपाठ उभ्या राहत आहेत.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

एकेकाळी मुंबई उद्योगनगरी म्हणून ओळखली जात होती. आज ती ओळख जवळ जवळ पुसली गेली असून, आजचे तिचे स्वरूप म्हणजे अतिभव्य ‘निवासी संकुल’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबईतील गिरणी संपानंतर आजघडीला बृहन्मुंबई क्षेत्रात काही औद्योगिक पट्ट्यांमधले छोटे उद्योग सोडले तर किती उद्योग उतरंडीला लागले आहेत हा संशोधनाचा विषय ठरेल.

गिरण्या बंद झाल्या, त्यांच्यावर आधारित प्रोसेस हाऊस बंद पडली, मोठमोठय़ा इंजिनीअिरग कंपन्या बंद झाल्या. औषध कंपन्या बंद झाल्या. केमिकल कंपन्या बंद झाल्या. इतर कंपन्या जेथे हजारो कामगार काम करत होते त्यासुद्धा बंद पडत गेल्या, काही लवकरच बंद होऊ शकतील.

संगणिकीकरणामुळे रेल्वे, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, पोस्ट, टेलिफोन, इतर सरकारी निमसरकारी उपक्रम, आस्थापना, बँका, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये आता नवीन कर्मचारी भरती अगदी नगण्य संख्येने होत असते.

बंद पडलेल्या गिरण्या, मोठमोठे इंजिनीअिरग कारखाने, औषध कारखाने, प्रोसेस हाउसेस यांची हजारो एकर जागा, शिवाय मोठमोठय़ा झोपडपट्टय़ांअंतर्गत येणाऱ्या कैक एकरांच्या जमिनी, मोकळ्या जागा, दलदलीच्या जागा, जुन्या चाळी आणि उपनगरात वसवलेली, तीन-चार मजल्यांच्या अनेक इमारती असलेली मोठमोठी असंख्य नगरे, जी आज ना उद्या पुनर्विकासामध्ये जाऊ शकतात. उदा. उन्नत नगर, डी. एन. नगर, टिळक नगर, कन्नमवार नगर, इत्यादी. इतर अनेक आणि त्याखालचा प्रचंड मोठा भूभाग, लहान टेकडय़ा सपाट करून मिळालेली मोठी जमीन, खाजणे बुजवून मिळवलेली जमीन अशी कुलाब्यापासून ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि पश्चिम उपनगरात दहिसपर्यंत आता सर्वत्र गगनभेदी उंचीच्या फक्त रहिवासी इमारती एकापाठोपाठ उभ्या राहत आहेत. किंवा भविष्यात उभ्या होऊ शकतात (सात-आठ मजल्यांच्या इमारती लहान ठेंगू ठरतायत) तेथे सर्व घरे अर्थात मालकी तत्त्वाची आणि ब्लॉक सिस्टीमची!

अशा सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील, काही घरे गेली कित्येक वर्षे कायम भाडेतत्त्वावर दिलेली असतात.

बृहन्मुंबईला जोडून असलेल्या भूभागावर हे असंख्य गगनभेदी इमारती बांधण्याचे लोण वेगाने पसरत चालले आहे.

मुंबईतील घरांच्या किमतींचा विचार करता, मुंबईचे अति दूरचे उपनगर म्हणून जे समजले जाते तेथे एका लहानशा घराची, ज्याचे क्षेत्रफळ जेमतेम चारशे-पाचशे चौरस फूट आहे, अशाची किंमत साधारण एक कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यावरून मुख्य मुंबईत घरांच्या किमती काय असू शकतील, याचा अंदाज करता येईल.

आता जवळपास नव्वद टक्के कामकाज हे संगणकावर केले जात आहे. संगणक तंत्रज्ञानातील अति वेगाने होत असलेले प्रयोग आणि बदल किंवा प्रगती लक्षात घेता, आज आहे ते उद्या कालबा ठरू शकते. याचाच दुसरा अर्थ कुठल्याही कामाची, कुठल्याही कामगाराला अगदी व्हाइट कॉलर कर्मचाऱ्यालाही शाश्वती उरलेली नाही. शिवाय, कुठलीही नोकरी ही घरी बसूनसुद्धा करता येऊ शकते. त्याची सुरुवात काही प्रमाणात सुरूही झाली आहे.

त्यातच आता उपनगरे धरून शहरांतर्गत आणि शहराला लागून असलेल्या परिघात वेगवान परिवहन व्यवस्थेचे, जमिनीखालून-वरून जलमाग्रे नवीन पर्याय उभे राहत आहेत.

समाजाच्या रोजच्या गरजा भागविणारे कामगार/ व्यावसायिक उदा. घरेलू कामगार, दूधवाले, भाजीवाले, किरकोळ वस्तू विक्रेते, असे अन्य बारीकसारीक हातावर पोट असणारे कामगार, कारागीर, यांची उत्पन्न मर्यादा लक्षात घेतली तर यांना लागणारा निवारा कसा हवा, हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही. पण त्या सर्वाची येथे मात्र आवश्यकता वादातीत आहे.

बृहन्मुंबईत निर्माणाधीन गृहनिर्माण प्रकल्प, नवीन होऊ घातलेले गृह प्रकल्प, यामधून नजीकच्या काळात तयार होणारी घरे याचा साकल्याने हिशेब मांडून आता कुठल्या प्रकारची आणि किती संख्येने राहण्यासाठी घरे पुढच्या काळात लागू शकतात, याचा गृहनिर्माण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांनी आणि अर्थातच शासनाने गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

मुंबई आणि उपनगरात अडीच लाख घरे गिऱ्हाईकांची वाट पाहात पडून आहेत, याबातमीचा त्या दृष्टिकोनातून विचार करून यापुढे गृहनिर्माण धोरण आखावे लागेल असे वाटते.

बंद पडलेल्या गिरण्या, मोठमोठे इंजिनीअिरग कारखाने, औषध कारखाने, प्रोसेस हाउसेस यांची हजारो एकर जागा, शिवाय मोठमोठय़ा झोपडपट्टय़ांअंतर्गत येणाऱ्या कैक एकरांच्या जमिनी, मोकळ्या जागा, दलदलीच्या जागा, जुन्या चाळी आणि उपनगरात वसवलेली, तीन-चार मजल्यांच्या अनेक इमारती असलेली मोठमोठी असंख्य नगरे, जी आज ना उद्या पुनर्विकासामध्ये जाऊ शकतात.

gadrekaka@gmail.com