News Flash

विस्तारतं बदलापूर

बदलापूर शहराच्या विविध भागांत अफोर्डेबल घरांपासून सुविधांनी सुसज्ज असलेल्या घरांपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांचे प्रकल्प सुरू असलेले पाहायला मिळतात.

| September 27, 2014 01:03 am

बदलापूर शहराच्या विविध भागांत अफोर्डेबल घरांपासून सुविधांनी सुसज्ज असलेल्या घरांपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांचे प्रकल्प सुरू असलेले पाहायला मिळतात.
राजकीय इच्छाशक्ती त्याचबरोबर कार्यक्षम सरकारी यंत्रणा या जोरावर बदलापूरचा झपाटय़ाने विकास होत आहे. जवळच्याच अंबरनाथ किंवा इतर ठिकाणांपेक्षा बदलापूरमधील विकासकामे अधिक जलदगतीने पूर्ण होत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतील. त्यात चांगले रस्ते, ड्रेनेज सिस्टम, स्कायवॉक इत्यादींचा समावेश करता येईल. चांगल्या दर्जेदार राहणीमानासाठी ज्या काही पायाभूत सोई हव्या असतात, त्या सगळ्या येथे तयार होत आहेत. शिवाय नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांच्या दृष्टीनेही इथल्या जागेच्या किमती आवाक्यात येतील अशाच आहेत. ८ ते १५ लाखांपर्यंतच्या अनेक प्रॉपटीज् येथे उपलब्ध आहेत. निसर्गरम्य परिसर आणि विकासाच्या मार्गावर असलेले एक दर्जेदार शहर यामुळे इथली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. इतर ठिकाणांच्या तुलनेत अगदी दर्जेदार बांधकामाकरिताही येथे साधारण नऊशे रुपये प्रति चौ.फू. बांधकामखर्च येत असल्याने भलेही प्रॉफिट मार्जिन कमी असले, तरी ग्राहकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता अनेक मोठे विकासकही बदलापूरमध्ये आपले प्रोजेक्ट उभारण्यास येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही निवडीसाठी वाव मिळतोय. बदलापूर स्टेशनपासून अवघ्या सात मिनिटांच्या अंतरावर ग्राहकांना १ बीएचकेपासून ते ४ बीएचकेपर्यंतचे सर्व प्रकारच्या घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. आज मुंबई किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसराविषयी बोलायचे झाल्यास बांधकामाकरिता मोकळी जागा मिळणे अशक्य झाले आहे. शिवाय जागेचे दरही मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. अशा वेळेस बदलापूरसारख्या ठिकाणी येऊन बांधकाम करणे कोणत्याही विकासकाच्या दृष्टीने सोयीचेच ठरते.
बरेच छोटे टाऊनशिप प्रोजेक्ट साकारत आहेत. ज्यात स्विमिंगपूलपासून योगा, टेनिस, क्रिकेट ग्राऊंड, जीम, कम्युनिटी सेंटर, क्लबहाऊसपर्यंत अनेक प्रकारच्या सुविधा तर आहेतच शिवाय एका कुटुंबासाठी दैनंदिन व्यवहारात ज्या सोई हव्या असतात त्यांपैकी एटीएम, बँका, हॉस्पिटल्स, शाळा, पाळणाघर, शॉपिंग मॉल इ. सुविधाही उपलब्ध आहेत. आठ ते पंधरा लाखांपर्यंतच्या घरांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून बदलापूर ओळखले जात असले, तरी साध्यासुध्या राहणीमानाबरोबरच निसर्गसान्निध्यात उभ्या राहणाऱ्या अनेक प्रोजेक्ट्समधून ग्राहकांना सुसज्ज जीवनाचा अनुभवही येथे घेता येणार आहे. मालमत्ता बाजारपेठेत वेगाने विकसित होणारे आणि नवीन घरांचा पर्याय उपलब्ध करून देणारे महानगर म्हणून बदलापूरची महती वाढत आहे. आज नव्याने घर घ्यायचे म्हटल्यास मुंबई आणि उपनगराचा विचारसुद्धा मनात येत नाही. शिवाय ठाणे आणि नवी मुंबईतील विकसित झालेल्या भागातील जागेचे दरही झापाटय़ाने वाढताहेत अशा परिस्थितीत अनेक जण भविष्याचा विचार करत कल्याण आणि त्यापुढेही जाऊन बदलापूर येथील जागेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य देताहेत. बदलापूर सध्या इथे जास्त बांधकाम जास्त चालू झाले आहे. बदलापूरचा विस्तार जास्त झाला आहे. चिखलोली.. हे नवीन स्टेशन अंबरनाथ आणि बदलापूर यांच्या दरम्यान उभारले जात आहे. इथेसुद्धा चांगला परिसर आणि चांगल्या बिल्डरचे गृहप्रकल्प चालू आहेत. बारवी डॅम जवळ आहे. हा भाग मालमत्ता बाजारपेठेत वेगाने डेव्हलप होणारा आणि नवीन घरांचा पर्याय उपलब्ध करून देणारे महानगर म्हणून बदलापूरची महती वाढत आहे. वांगणी येथे नवीन रेल्वेची कारशेड उभारत आहे.. त्यामुळे लोकल ट्रेन्स वाढतील.. अशामुळे नोकरदार वर्ग बदलापूर-वांगणी-नेरळला मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:03 am

Web Title: extensions of badlapur
टॅग : Badlapur
Next Stories
1 निसर्गाच्या कुशीतलं नेरळ
2 सुनियोजित पनवेल
3 भिंत : भरभक्कम सांस्कृतिक आधार
Just Now!
X