ws4तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा, घराची रचना, रंग आणि शोभेच्या वस्तूंमधून तुमचे व्यक्तिमत्त्व झळकत असते. पारंपरिक, आधुनिक किंवा भविष्याचा वेध घेणारे.. यांपकी कोणत्याही प्रकारचे फíनचर, एकंदर रचना, भिंती व फरश्यांचे टेक्स्चर यातून तुमच्या घराविषयीच्या कल्पनांबद्दल बरेच काही कळून येते.
पूर्वी सीलिंग सुशोभित करण्याकडे लोकांचा फारसा कल नसायचा. त्याऐवजी भिंती आणि जमिनीवरील फरशांच्या सजावटीकडे जास्त लक्ष दिले जायचे. आज फॉल्स सीलिंगमध्ये उपलब्ध असलेल्या विविध डिझाइन्स लक्षात घेता निवडीस भरपूर वाव असून, घराची पुनर्रचना करताना फॉल्स सीलिंग करणे अविभाज्य झाले आहे.
फॉल्स सीलिंग
ws5इंटेरियर व डिझाइनच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास सीलिंग ही घरातील कोणतेही अडथळे नसलेली जागा आहे. फॉल्स सीलिंगमुळे घराला एक प्रकारचा ठोस लुक येतो. खोलीचे स्वरूप वेगळे भासते आणि एकंदर वातावरण तुमच्या अभिरुचीनुसार सजवता येते. सीलिंगच्या डिझाइनसाठी भरपूर पर्याय उपलब्ध असून, त्यामुळे कोणत्याही खोलीची सजावट आणखी उठावदार दिसते. असे सीलिंग फक्त सुंदरच दिसते असे नाही, तर त्याचे इतर फायदेही आहेत. फॉल्स सीलिंगमुळे थर्मल आणि आवाजासाठी एक स्तर मिळतो, प्रकाश जास्त चांगल्या प्रकारे परावर्तित होतो; तसेच कन्सील्ड व डिफ्यूज्ड लायटिंगची सोय होते.
फॉल्स सीलिंग हे मुख्य सीलिंगच्या आराखडय़ाला मेटल फ्रेमिंग बांधणीने जोडलेले दुसरे सीलिंग असते. जिप्रॉक जिप्सियम प्लॅस्टरबोर्ड
वापरून त्याचे फिनििशग केले जाते, ज्यामुळे त्याचे फिनिशिंग एकसारखे होते आणि ते आकर्षक दिसण्याकरिता हव्या त्या डिझाइनचा आकारही देता येतो.
फॉल्स सीलिंगचे फायदे
फॉल्स सीलिंग हे फक्त डिझाइन नसते, तर त्याचे अनेक फायदेही तुम्हाला मिळतात. फॉल्स सीलिंगमुळे मिळणारे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे-
सौंदर्य :
१) तुमच्या घराला आधुनिक लुक मिळतो; जो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असतो.
२) एकसारखे व अभिरुचीपूर्ण फिनिशिंग (प्लॅस्टरच्या पृष्ठभागामुळे येणारा खडबडीतपणा यात येत नाही.)
ws6३) प्रकाशयोजनेचे पर्याय- घरातील फॉल्स सीलिंगमुळे प्रकाशयोजनेचे स्पॉट लायटिंगपासून (वाचनासाठीचे लाइट्स), मूड लायटिंग (पार्टी किंवा निवांत वातावरणासाठी) भरपूर पर्याय मिळतात.
४) वायर्स लपवता येतात- फॅन, लायटिंग, एअरकंडिनशर यांसारख्या उपकरणांचे वायिरग फॉल्स सीिलग व सॉफिटच्या मधून सहजपणे नेता येते. यामुळे वायर गुंतण्याची शक्यता कमी होते आणि त्या लपवल्या जात असल्यामुळे घर स्वच्छ दिसते.
ऊर्जा कार्यक्षमता- फॉल्स सीलिगमुळे सॉफिट आणि फॉल्स सीलिंगच्या पातळीदरम्यान जागा तयार होते आणि त्यातून थर्मलचा स्तर तयार होतो, जो खोलीतील अतिरिक्त हवा कमी करतो. पर्यायाने एअरकंडिशनरवरचा ताणही कमी येतो. यामुळे जागा थंड ठेवण्यासाठी कमी वीज वापरली जाते.
थर्मल स्तर- सर्वसामान्य घरांमध्ये सीलिंगचा थेट उन्हाशी संबंध येतो आणि त्यातून गरम हवा बाहेर येत राहाते. फॉल्स सीिलगमुळे सॉफिट व फॉल्स सीलिंग यात थर्मलचा स्तर तयार होतो आणि त्यातून उष्णतेचापरिणाम कमी होतो.
आवाजाचा स्तर- वरच्या घरातून येणारा आवाज ही बऱ्याच घरांतील अडचण असते. फॉल्स सीलिंगमुळे तुमच्या व वरच्या घरादरम्यान आणखी स्तर तयार होतो आणि तिथून येणारा आवाज आपोआप कमी होतो.
प्लॅस्टरबोर्ड वेगाने आणि सहजपणे बसवता येतात. जिप्सम असलेले प्लॅस्टरबोर्ड वापरून तयार केलेले फॉल्स सीलिंगही बसवण्यास सोपे असते. प्लेन फॉल्स सीलिंग बसवण्याचे काम एका आठवडय़ात, तर डिझायनर फॉल्स सीलिंगचे काम त्यांतील गुंतागुंतीनुसार एक ते दोन आठवडय़ांत पूर्ण करता येऊ शकते. त्यामुळे फॉल्स सीलिंगचे काम रंग देण्यापेक्षाही अधिक वेगाने होऊ शकते. फॉल्स सीलिंगची किंमत वाजवी असते व ते गुंतवलेल्या पशांचे पूर्ण मूल्य देतात.
फॉल्स सीलिंगचा वापर करून तुम्ही तुमच्या घराला उत्तम लुक देऊ शकता.
  व्यवस्थापकीय संचालक,
 सेंट-गोबेन इंडिया प्रा. लि.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?