घरामध्ये गुंतवणूक ही जगातील सर्वाधिक लोक करत असलेली मुख्य गुंतवणूक आहे. कुणाही व्यक्तीसाठी हे जीवनभराचे स्वप्न असते. गृहकर्ज हे सर्वात महत्त्वाचे असते. स्थावर मालमत्तेच्या किमतीत होत असलेली भरमसाट वाढ आणि हळूहळू वाढत जाणारी भांडवल मूल्ये यांमुळे आता स्वत:च्या घरासाठी पसे उभारणे अशक्य होत चालले आहे. आपल्याकडे अनेक बँका आणि वित्तीय संस्था आहेत, जिथे कुणीही उत्कृष्ट शक्यप्राय असणारी गृहकर्जे घेऊ शकते. पण सध्याच्या बाजारपेठीय परिस्थितीमध्ये ‘करकपात’ सर्वात महत्त्वाचा घटक आहे. गृहकर्ज घेण्यामुळे दोन हेतू साध्य होतात. एक- तुम्हाला स्वत:चे घर खरेदी करायची संधी मिळते आणि सहजसोप्या हप्त्यांमध्ये पसे भरण्याची मुभा मिळते. दुसरे म्हणजे तुम्हाला आयकर कायद्यांतर्गत अनेक फायदे मिळतात.
गृहकर्ज घेण्याचे आणि परत फेडण्याचे करसंबंधित लाभ
एका वर्षांमध्ये व्याज आणि तुमच्या परतफेडीची मुद्दल दोन्हींचा दावा करण्यायोग्य असला पाहिजे.
*कलम २४ अंतर्गत कपातीच्या रूपाने व्याजाचा दावा केला जाऊ शकतो. १५०,००० रुपयांपर्यंत किंवा परतफेडीचे प्रत्यक्ष व्याज यांमध्ये जे कमी असेल त्यासाठी तुम्ही दावा करू शकता. (जेव्हा तुम्ही घराची मालकी घ्याल, तेव्हाच तुम्ही व्याजाचा दावा करू शकता.)
*कलम ८० क अंतर्गत कमाल १००,००० रुपयांपर्यंत मुदलाचा दावा करू शकता. हे सर्व ८० क गुंतवणुकीमध्ये १००,००० रुपयांच्या अधिकतर गुंतवणुकीच्या अधीन आहे.   
*परतफेडीचे वर्ष तसेच त्याचे व्याज आणि मुद्दल दाखवणारे कर्जदाराकडून घेतलेले निवेदन तुम्हाला दाखवावे लागेल.
स्वत:च्या मालकीचे घर
*देय व्याजाची करकपात कर्जाची प्रभावी किंमत कमी करते. स्वत:ची मालकी असणाऱ्या घराच्या बाबतीत, ३० टक्के कर ब्रॅकेटमधील व्यक्तीसाठी करबचतीमध्ये १.५० लाख रुपयांची कपात ४१,००० रुपयांपर्यंत अनुवादीत होते. उदाहरणार्थ, कर्जदाराकडे एकूण करपात्र उत्पन्न १० लाख रुपये असेल आणि गृहकर्ज नसेल तर तो १० लाख रुपयांवर कर भरण्यास पात्र आहे. जर त्याने गृहकर्ज घेतले आणि घर स्वत:च्या मालकीचे असेल, तसेच तो त्या वर्षांमध्ये १.६० रुपयांचे व्याज भरत आहे, तो त्याच्या एकूण करपात्र उत्पन्नातील १.५० लाख रुपयांचा दावा करू शकतो. यामुळे तो १० लाख रुपयांमधील १.५० लाखांपेक्षा कमी रुपयांवर करपात्र ठरेल, जे फक्त ८.५० लाख रुपये असेल.
*पहिले घर, जे स्वत:च्या मालकीचे नाही
तुमच्या दुसऱ्या घरावर स्वत:च्या मालकीच्या रूपाने दावा करून तुम्ही दुसऱ्या घरावर कराचा फायदा घेऊ शकता. जर तुम्ही दोन घरांचे मालक असाल तर तुम्ही फक्त एकावरच स्वत:च्या मालकीच्या रूपाने दावा करू शकता, तथापि दुसरे घरबाबाह्य संपत्ती म्हणून गृहीत धरली जाईल.
दुसऱ्या घराचे अपेक्षित भाडे तुमच्या उत्पन्नामध्ये मिळविले जाईल आणि अ‍ॅप्लिकेबल टॅक्स स्लॅबप्रमाणे कर आकारला जाईल. तथापि अपेक्षित भाडय़ातील गृहकर्जावर व्याजकपातीची परवानगी तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला करबचत करायची असेल आणि तिच्या नावावर इतर कोणतीही रहिवासी मालमत्ता नसेल तर तुमच्या जोडीदाराच्या नावाने गुंतवणूक करा. तुम्हाला दुसऱ्या घरावरील संपत्ती करदेखील भरावा लागेल, कारण फक्त एकच रहिवासी मालमत्ता करमुक्त असते. हे टाळण्यासाठी तुम्ही व्यावसायिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू शकता.
*करबचतीच्या संदर्भात संयुक्त गृहकर्ज
जर पती-पत्नी दोघेही कमावते असतील तर दोघेही  तुमच्या आयकर परताव्यामध्ये वेगवेगळ्या कपातीचा दावा करू शकता. कर्जाच्या मुद्दल रकमेची परतफेड प्रत्येक सहमालकाद्वारे किमान एक लाख रुपये रकमेपर्यंत कलम ८० क अंतर्गत कपातीच्या रूपाने दावा करू शकता.    
एकापेक्षा अधिक व्यक्तीकडून घराची खरेदी आणि प्रत्येक सहमालक त्यात राहत असेल तर प्रत्येक सहमालकाला १.५ लाख रुपये किमान रकमेपर्यंतच्या कर्जाच्या पशांवर व्याजाची राशी वैयक्तिकपणे कपातीसाठी अधिकार मिळेल. जर घर भाडय़ाने दिले असेल तर या रकमेसाठी कोणत्याही मर्यादा नाहीत. दोन्ही सहमालक मालकीनुसार कपातीचा दावा करू शकतात.
*गृहकर्ज तसेच घरभाडे भत्ता (एचआरए)यापासून कर लाभ
वित्तीय वर्षांदरम्यान तुमचे घर राहण्यासाठी तयार असेल, तरच तुम्ही गृह फायद्यावरील दाव्याचा फायदा घेऊ शकता. तुमच्या घराचे बांधकाम झाले की एचआरएचे फायदे संपुष्टात येतात. जर तुम्ही गृहकर्ज घेतलेत, घराची मालकी घेतली, भाडय़ाने दिले आणि भाडय़ाच्या घरामध्ये राहत आहात, तर वर उल्लेख केलेल्या सर्व तीन फायद्यांचा हक्क द्यावा लागेल. तथापि, या बाबतीत तुम्हाला प्राप्त झालेले भाडे तुमचे करपात्र उत्पन्न म्हणून ग्राह्य़ धरण्यात येईल.
*दोन वेगवेगळ्या मालमत्तांवर दोन गृहकर्जे
दोन्ही कर्जावर तुम्हाला ८० क चा फायदा मिळू शकतो. तथापि एकूण रक्कम, जी दोन्ही घरांसाठी एकूण १००,००० रुपये असेल.
तुमच्या कोणत्याही घरकर्जासाठी तुमच्या गृहकर्जाचे व्याज तुमच्या वेतन उत्पन्नातून प्रत्यक्षपणे कपात केले जाणार नाही. घर मालमत्तेचे उत्पन्न तुम्ही विकत घेतलेल्या प्रत्येक फ्लॅटसाठी मोजले जाईल. जर या मोजणींनी तोटा दाखवला तर हा तोटा अन्य बाजूंनी तुमच्या उत्पन्नाच्या विरुद्ध दाखवला जाईल.
कलम २४ कपातीसाठी, तुम्ही स्वत: गुंतवणूक केलेल्या घरावर तुम्ही १,५०,००० रुपयांपर्यंतचा व्याजफेडीचा लाभ घेऊ शकता. दुसऱ्या मालमत्तेसाठी तुम्ही प्रत्यक्ष व्याज परतफेडीचा दावा करू शकता. त्यासाठी मर्यादा नाही.
*बांधकाम चालू असणाऱ्या मालमत्तेसाठी करपद्धती
बांधकाम चालू असणाऱ्या मालमत्तेसाठी कुणीही बांधकाम पूर्ण होईपर्यंत आणि मालकी मिळेपर्यंत कपातीचा दावा करू शकत नाही. एकदा मालकी मिळाली की पूर्व-बांधकाम कालावधीदरम्यान व्याजफेडीसाठी कपातीचा दावा करू शकता. बांधकाम पूर्ण होण्याच्या अगोदर फेडलेले व्याज बांधकाम पूर्ण झालेल्या वर्षांपासून पाच सलग आíथक वर्षांसाठी पाच समान हप्त्यांमध्ये करकपातीच्या रूपाने स्वीकारले जाईल.