गौरी प्रधान

लहानशा घरातदेखील जागेचे नीट व्यवस्थापन केले असता आहे त्या जागेत मोठय़ा जागेत मिळणाऱ्या सुखसोयी आपण मिळवू शकतो. याशिवाय आणखी एक मुद्दा म्हणजे, मोठय़ा शहरातून आज जागेचे भाव पाहता नवीन घर घेण्याऐवजी जुन्या घरावरच पुरेसा खर्च केला तर नव्या घराच्या जवळपास एक चतुर्थाश किमतीत आपण नव्या घरात जाण्याचा आनंद मिळवू शकतो.

guide to buying and designing wardrobes
घर स्वप्नातलं : ‘दिसणं’ सुधारणारा वॉर्डरोब
disadvantages of buying property at discount for long term period
सवलती आणि मालमत्ता खरेदी
penalties under bye laws penalty in certain cases mandatory mentioned in Bye Laws for housing society
उपविधींमधील नमूद दंड आकारणे बंधनकारक
Loksatta vasturang Information about redevelopment tenement house
पुनर्विकासाचे धडे:  किती वर्षे एका घरात?

आमचं घर लहान आहे, मग आम्ही काय इंटेरियर डिझायनरकडून घर डिझाइन करून घेणार? आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पडणारा नेहमीचा प्रश्न. जणू काही इंटेरियर डिझायनरकडून घराचं काम करून घेणं हे फक्त आणि फक्त मोठ्ठं घर असणाऱ्यांचंच काम आहे, त्यातूनही ते खूप पैसेवाल्या लोकांचंच काम आहे, असे काही दृढ गैरसमज आपल्याकडे सर्रास दिसतात.

हो गैरसमजच, कारण जितकी इंटेरियर डिझायनरची गरज मोठं घर असणाऱ्यांना असते, तितकीच ती लहान घर असणाऱ्यांनादेखील असते. जर तुमचं घर लहान असेल तर त्याच्या जागेचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक. बरेचदा आपण आपल्या घराला जितकं लहान समजत असतो तेवढं प्रत्यक्षात ते नसतं. अनेक छुपे कानेकोपरे दुर्लक्षित राहतात. चुकीचं फर्निचर केल्यानं विनाकारण जागा व्यापली जाते. इंटेरियर डिझायनर काय करतो, तर आधी तुमच्या घराची व्यवस्थित मोजमापे घेऊन घरातल्या जागेचं प्रतीकात्मक व्यवस्थापन करतो, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. या व्यवस्थापनामुळे आपल्याला आपल्याच घराची नव्यानं ओळख होते. किती तरी भाग जो आपण प्रत्यक्षात वापरतच नाही तो यामुळे वापरात येण्यास मदत होते. इथे मी एका घराचा आधीचा आणि नंतरचा असे दोन लेआऊट मुद्दाम दाखवत आहे. आधीच्या लेआऊटमध्ये तुम्ही पाहू शकाल की किचनमध्ये ओटा आणि एक कडाप्प्याची मांडणी दिसत आहे, ज्यामुळे मधे वावरण्यास अगदी कमी जागा मिळते आहे. शिवाय फ्रिज आणि वॉशिंग मशीननं संपूर्ण पॅसेज व्यापला गेला आहे. किचन आणि लिव्हिंग रूममधील स्लाइिडग दरवाजादेखील किचनच्या आतील बाजूस आहे, ज्यामुळे देखील पॅसेजच्या वापरावर निर्बंध येतात. आणखी एक गोष्ट म्हणजे सर्वसाधारण वन बीएचके प्रमाणे इथं एक शौचालय आणि एक बाथरूम दिलेलं आहे.

लिव्हिंग रूममध्ये पाहिलं तर टीव्ही आणि सोफा सेट हे एकमेकांना काटकोनात असल्यानं टीव्ही पाहणं अवघड होतं, शिवाय एक मोठा कोनाडा फक्त टीव्हीसाठी वाया जात होता. आता आपण काय बदल केला ते पाहू. प्रथम आपण जिथे फक्त भारतीय शौचालय होतं तिथली भिंत पुढे सरकवून तिथे कमोड आणि शॉवर अशा दोन्ही गोष्टी बसवल्या, ज्यामुळे आता त्यांना दोन बाथरूम वापरायला मिळतात. ती भिंत सरकवल्यानं किचनदेखील व्यवस्थित आयाताकृती झालं. आता वॉशिंग मशीन आणि फ्रिज एका रांगेत घेऊन वॉशिंग मशीनच्या वरील भागात मायक्रोव्हेवसाठी आपल्याला जागा करता आली आणि बाजूला एक सात फूट उंच कपाटदेखील देता आलं. किचनमधील जुन्या पद्धतीची कडाप्प्याची मांडणी काढून त्याऐवजी आपण इंग्रजी एल आकाराचा ओटा दिला, ज्याच्या एका कोपऱ्यात भांडी घासण्याचं सिंक गेलं व कोपऱ्यात मिक्सरसाठी कायमची जागा करता आली. एवढं करून देखील स्वयंपाकाला पुरेशी जागा उरली आहे. स्टोरेजसाठी सिंकच्या वर कपाटं तसंच ओटय़ाखाली ट्रॉली बनवून नीटनेटकी जागा केली. पॅसेजमध्ये देखील फक्त दोन बाथरूम तयार करून न थांबता, स्लाइिडग दरवाजा बाहेर लिव्हिंग रूममध्ये घेऊन एक व्यवस्थित मोठं वॉश बेसिन काउंटर दिलं- जे एरवी वन बीएचकेमध्ये मिळणं फारच अवघड असतं. आता लिव्हिंग रूमकडे वळू या. इथे सगळय़ात आधी टीव्हीचा कोनाडा रिकामा करून तिथे छतापर्यंत स्टोरेज दिलं. बैठकीत सोफ्या ऐवजी सोफा कम बेड दिला, जेणेकरून रात्री झोपण्यासाठी देखील तो वापरता यावा, आणि त्यासोबत एक ऑट्टोमन ज्यामुळे बैठक परिपूर्ण दिसत आहे. टीव्हीची व्यवस्था देखील आता आपण सोफ्याच्या अगदी समोर केली आहे, ज्यामुळे आता टीव्ही पाहताना मानेला त्रास होणार नाही.

बेडरूमदेखील लहान असल्याने तिथे वॉर्डरोब, देव्हारा आणि एक पूल आऊट बेड अशी मांडणी केली. ज्यामुळे दिवसभर जास्तीत जास्त मोकळी जागा घरात वापरायला मिळते आणि सोबतच रात्री झोपण्याची देखील गैरसोय होत नाही. इथे आपण बघितले की लहानशा घरातदेखील जागेचे नीट व्यवस्थापन केले असता आहे, त्या जागेत मोठय़ा जागेत मिळणाऱ्या सुखसोयी आपण मिळवू शकतो. याशिवाय आणखी एक मुद्दा म्हणजे, मोठय़ा शहरातून आज जागेचे भाव पाहता नवीन घर घेण्याऐवजी जुन्या घरावरच पुरेसा खर्च केला तर नव्या घराच्या जवळपास एक चतुर्थाश किमतीत आपण नव्या घरात जाण्याचा आनंद मिळवू शकतो, ज्यात संपूर्ण सिव्हिल वर्क, जसे की घराचे फ्लोअरिंग, टॉयलेट बाथरूमच्या टाइल्स बदलणे, नवे प्लंबिंग, संपूर्ण नवे इलेक्ट्रिकचे काम, मोडय़ुलर किचन, फॉल्स सीलिंग, पेंटिंग आणि अर्थात नव्या कोऱ्या फर्निचरचा देखील समावेश होतो.

घरात एवढे सगळे बदल करताना इमारतीला तर काही धोका नाही ना पोहोचणार अशी

रास्त शंका देखील तुमच्या मनात येऊ शकते. पण इथे जर दोन्ही आधीचा आणि नंतरचा लेआऊट तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, हे काम करताना इमारतीच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली गेली आहे. यात कुठेही बिम कॉलम आणि कुठल्याही आर. सी. सी मेंबरला हातही लावला नाहीये. शिवाय बाहेरच्या भिंतींची देखील कुठेही तोडमोड न करता फक्त आतून काही बदल करून आपण घराला नवे स्वरूप प्राप्त करून दिले आहे.

जितकी इंटेरियर डिझायनरची गरज मोठं घर असणाऱ्यांना असते, तितकीच ती लहान घर असणाऱ्यांनादेखील असते. जर तुमचं घर लहान असेल तर त्याच्या जागेचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक. बरेचदा आपण आपल्या घराला जितकं लहान समजत असतो तेवढं प्रत्यक्षात ते नसतं. अनेक छुपे कानेकोपरे दुर्लक्षित राहतात. चुकीचं फर्निचर केल्यानं विनाकारण जागा व्यापली जाते. इंटेरियर डिझायनर काय करतो, तर आधी तुमच्या घराची व्यवस्थित मोजमापे घेऊन घरातल्या जागेचं प्रतीकात्मक व्यवस्थापन करतो, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो.

pradhaninteriorsllp@gmail.com