संदीप धुरत
एकंदरीत, नवीन घर खरेदी करून २०२२ मध्ये गुढीपाडवा सणाचा दिवस पूर्णपणे नवीन पद्धतीने साजरा करण्यासाठी सज्ज व्हा. आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करा. गुढीपाडव्याला खऱ्या अर्थाने आनंदी बनवण्यासाठी या वेळी बिल्डर्सने ऑफर केलेल्या सर्व सवलती, योजना आणि प्रोत्साहनांचा लाभ घ्या.
द घर खरेदी करण्यासाठी किंवा नवीन प्रकल्प/ कार्यक्रम सुरू करण्यासाठी गुढीपाडवा हा शुभ दिवस मानला जातो. साधारणपणे फ्लॅट्सचे बुकिंग याच सुमारास सुरू होते आणि दिवाळीपर्यंत चालू राहते. अनेक घर खरेदीदारांचा असा विश्वास आहे की पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घर अथवा वास्तू खरेदी केल्याने सुख, समाधान आणि समृद्धी येते.
पाडव्याच्या दिवशी नवीन गुंतवणुकीचा विचार करण्यामागची कारणे- १. नवीन कामाची सुरुवात करण्यास गुढीपाडवा हा एक शुभ दिवस मानला जातो. २. या दिवशी नवीन प्रकल्पात गुंतवणूक करणे किंवा मालमत्ता घेणे हे शुभ मानले जाते. ३. या दिवशी मालमत्ता खरेदी करून किंवा नवीन व्यवसाय सुरू करून नवीन गुंतवणूक करणे अनुकूल मानले जाते. कारण या दिवशी दीर्घकालीन खरेदी केल्यास संपत्ती आणि आनंद वाढतो असा लोकांची भावना आहे.
विशेष म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर विकासक गृह खरेदीवर चांगली सवलत आणि आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देतात.मागील दोन वर्षांपासून असलेला कसोटीचा करोनाकाळ आणि त्यानंतर उद्योग क्षेत्राला आलेली मरगळ यांमधून पाडवा सण यंदा आशादायक ठरणार यातशंका नाही. जनजीवन पूर्वपदावर येण्याचे आणि आर्थिक घडी पुन्हा सुव्यवस्थित होण्याचे ते चिन्ह असेल. परिणामी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घट आणि जास्त विक्री न झालेल्या घरांच्या संख्येमुळे, खरेदीदारांसाठी ठरावीक कालावधीत नवीन प्रकल्प येण्याची वाट न पाहता, रेडी-टू-मूव्ह अर्थात तयार फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. रेराने वेळेवर वितरण, प्रकल्पाची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर आश्वासन दिल्याप्रमाणे, या क्षेत्रामध्ये आधीच खूप सकारात्मकता दिसून येत आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती प्रकल्पाच्या सध्याच्या टप्प्यापासून, विकासकाद्वारे घेतलेल्या किंवा प्रलंबित परवानग्या इत्यादी सार्वजनिक माहितीसाठी उपलब्ध असतात. याद्वारे जे ग्राहक त्यांचे कष्टाचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात, त्यांना सुरक्षितता प्राप्त होते.
भारतीय रिअल इस्टेटमधील मालमत्ता बाजाराची इको सिस्टीम आता बरीच चांगली आहे. कारण अर्थव्यवस्था आता सुधारण्याचे संकेत दर्शवित आहे- ज्यामुळे खरेदीदार नवीन घर खरेदीसाठी प्रवृत्त होतील. सध्या उपलब्ध असलेल्या मालमत्तांच्या दृष्टिकोनातून, डेव्हलपर्स दर्जेदार प्रकल्प आणत आहेत, ज्यामुळे ग्राहकांचे गृहस्वप्न नक्कीच पूर्ण होईल. या दरम्यान विकासकांनी उत्तम प्रकारे आपल्या प्रकल्पांचे मार्केटिंग करणे अतिशय आवश्यक आहे. तसेच एखादी जाहिरात प्रसिद्ध करताना त्यामध्ये काही उणीव किंवा चूक नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. कारण तसे असेल तर ग्राहक आकर्षित होण्यापेक्षा दूर जाण्याची शक्यता अधिक.
गुढीपाडव्याच्या दरम्यान गुंतवणूक करताना विचारात घेण्यासारखे मुद्दे –
१. निर्णय घेण्याची घाई करू नका – केवळ ऑफरचा मोह आहे म्हणून घाईने निर्णय घेणे योग्य नाही. तुमच्या कुटुंबाच्या गरजा, भविष्यातील गरजा, तुमची आर्थिक परिस्थिती आणि कर्ज पात्रता रकमेचे विश्लेषण केल्याची खात्री करा.
२. जागेचे ठिकाण योग्य असल्याची खात्री करा- मालमत्ता असलेले स्थान योग्यरीत्या तपासा आणि आसपासच्या परिसरात आवश्यक सुविधा आहेत का ते पाहा. मालमत्तेमध्ये सर्व आधुनिक सुविधाही असायला हव्यात. तसेच, जवळपास शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि वाहतूक सुविधा आहेत का ते तपासा.
३. बिल्डरची माहिती- घर घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्या बिल्डरशी संबंधित माहिती तपासणे खूप महत्त्वाचे आहे. बिल्डरबद्दलची ग्राहकांनी व्यक्त केलेली मते वाचा आणि बांधकामाच्या गुणवत्तेची कल्पना घ्या, याआधी पूर्ण केलेल्या प्रकल्पांचा आढावा घ्या आणि ते प्रकल्प पूर्ण होण्यात काही विलंब झाला का याची माहिती मिळवा.
गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी अनेक विकासक बाजारात अनेक सवलती आणि ऑफर घेऊन येतात. आणि हे खरेदीदारांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आणि बचत करण्यासाठी प्रेरित करेल. नवीन आणि आकर्षक पेमेंट योजना आणि बुकिंग सवलतींपासून ते इतर ऑफपर्यंत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करणे सोपे करू शकतात.
एकंदरीत, नवीन घर खरेदी करून २०२२ मध्ये गुढीपाडवा सणाचा दिवस पूर्णपणे नवीन पद्धतीने साजरा करण्यासाठी सज्ज व्हा. आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करा. गुढीपाडव्याला खऱ्या अर्थाने आनंदी बनवण्यासाठी या वेळी बिल्डर्सने ऑफर केलेल्या सर्व सवलती, योजना आणि प्रोत्साहनांचा लाभ घ्या. फक्त तुम्ही सर्व अटी व शर्ती वाचल्याची खात्री करा आणि कोणतीही महत्त्वाची गोष्ट/ मुद्दा चुकवू नका. विविध बिल्डर्स आणि प्रकल्पांची विस्तृत माहिती घ्या.
भारतात सणांना खूप महत्त्व आहे आणि हा काळ बाजारात मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहारांच्या उलाढालीचा असतो. घर खरेदी करणे हा एक भावनिक निर्णय आहे आणि लोक नवीन प्रारंभासाठी एखाद्या शुभ प्रसंगाची वाट पाहतात. घरांच्या वाढत्या मागणीमुळे यंदा गृह खरेदी आश्वासक आणि उत्तम राहील असा अंदाज आहे. सणासुदीच्या काळात मालमत्तेच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असेल, ज्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी चांगला कालावधी असेल. आजची बाजारपेठ खरेदीदारांसाठी खूप स्थिर आहे, पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे घरात गुंतवणूक करण्याची ही चांगली वेळ आहे.