मनोज अणावकर
आपण जेव्हा मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई उच्च न्यायालय किंवा मुंबईतल्या जुन्या चर्चच्या इमारती बघतो; तेव्हा या ब्रिटिशकालीन वास्तूंच्या खिडक्या आणि छतांमध्ये केलेला रंगीत आणि आकर्षक काचांचा वापर बघताना आपलं मन मोहून जातं. पण केवळ इमारतींच्या दर्शनी भागातच काचांचा वापर होतो असं नाही, तर अगदी तुमच्या घराची अथवा कार्यालयांची अंतर्गत सजावट करतानाही काचेचा सुयोग्य वापर करून तुमचं घर अथवा कार्यालयही तुम्ही अगदी आकर्षक आणि आगळय़ावेगळय़ा पद्धतीने सजवू शकता. तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची तसंच समाजमाध्यमांवर तुम्ही पोस्ट केलेल्या तुमच्या वास्तूचे फोटो बघणाऱ्या तुमच्या नातेवाईकांचं आणि मित्र परिवाराचं मनही तुम्ही अशा प्रकारे मोहून टाकू शकता. त्याकरिता फक्त तुम्हाला एवढंच माहीत असायला हवं की, काचांचे प्रकार कोणते, ते प्रकार कुठे आणि कसे वापरावेत आणि कुठे त्यांचा वापर टाळावा. याकरिता आजच्या भागात याच विषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. या लेखात थोडक्यात या काचांचे प्रकार, त्या कशा तयार केल्या जातात, त्यांचे गुणधर्म आणि त्यावर आधारित त्यांचा वापर कोणत्या ठिकाणी करता येईल, ते सांगितलं आहे.

काचेचा प्रकार

*   फ्लोट अथवा अॅंनिल्ड काच

*   काचेबाबतचा तपशील- वितळवलेल्या पत्र्याच्या लादीवर वितळवलेल्या काचेचा थर ओतून तयार करतात.

*   गुणधर्म- स्वच्छ, पारदर्शक ३

ते १९ मिलिमीटर जाडीमध्ये उपलब्ध, आघातानंतर धारदार लहान तुकडय़ात

विखुरते.

*   काचेचा उपयोग कुठे करावा- खिडक्यांसाठी तसंच जर लॅमिनेशन केलं तर फर्निचरसाठीही उपयुक्त.

*  काचेचा उपयोग कुठे करू नये-

जिथे सुरक्षा आवश्यक आहे तिथे.

किंवा दरवाजांकरिता वापरू नये कारण फुटल्यास शारीरिक इजा होऊ शकते.

*   टफण्ड किंवा टेम्पर्ड काच

’   काचेबाबतचा तपशील- ६५०० सेल्सिअस तापमानाला गरम करून नंतर जलदपणे थंड करून तयार करतात, त्यामुळे दाब सहन करते.

’   गुणधर्म- वरील प्रकारापेक्षा ४ ते ५ पटींनी अधिक ताकदवान, फुटल्यास कमी धारदार मोठय़ा तुकडय़ात विखुरते, अधिक तापमान सहन करू शकते.

’   काचेचा उपयोग कुठे करावा- बाथरूममध्ये गरम पाण्याचा वापर असलेल्या शॉवरच्या भागासाठी वेगळी केबिन करायची असल्यास, घराच्या तापणाऱ्या छतात काचेचा झरोका करण्यासाठी, इ.

’   काचेचा उपयोग कुठे करू नये- किंमत अधिक असल्याने सर्वसाधारण फर्निचरकरिता वापर टाळावा

*   लॅमिनेटेड किंवा सुरक्षा काच

’   काचेबाबतचा तपशील- पॉलिव्हिनाइल ब्युटिराल ( PVB) किंवा इथिलिन व्हिनाइल अॅासिटेट (EVA) अशा विशेष प्रकारच्या गोंदाने दोन किंवा अधिक काचा एकमेकांना चिकटवून तयार करतात.

’   गुणधर्म- तुटल्यावरही तडय़ासह तशीच राहते, पटकन तुकडय़ात विखुरली जात नाही, अतिनील ( वश्) किरणांपासून संरक्षण देते आणि ध्वनिरोधक असते.

’   काचेचा उपयोग कुठे करावा- काचेची छतं, झरोके, जिन्याच्या पायऱ्या, ध्वनिमुद्रण स्टुडिओ यांच्याकरता अत्यंत उपयुक्त. तसेच गजबजलेल्या रस्त्यांजवळील घरे आणि कार्यालयांच्या खिडक्यांकरिता उपयुक्त.

’   काचेचा उपयोग कुठे करू नये- वजनाने जड असल्यामुळे जिथे वजनाने हलकी काच आवश्यक आहे, अशा ठिकाणी वापर टाळावा.

१   इन्सुलेटेड ग्लास युनिट ( कॅव) काच

’   काचेबाबतचा तपशील- दोन किंवा अधिक काचांमध्ये हवा किंवा निष्क्रिय वायू सीलबंद करून तयार करतात.

’   गुणधर्म- उष्णतारोधक, ध्वनिरोधक आणि ऊर्जा सक्षम.

’   काचेचा उपयोग कुठे करावा- खिडक्यांसारख्या बा भागांसाठी तापमान नियंत्रित ठेवण्याकरता हरित इमारतींमध्ये वापर.

’   काचेचा उपयोग कुठे करू नये- अन्यत्र सर्वसाधारण फर्निचरकरिता ही काच खूप महाग असते.

*   वायर्ड काच

’   काचेबाबतचा तपशील- बारीक तारांची जाळी या काचेत तयार करताना घालतात. त्यामुळे ती अग्निरोधक होते, तसंच तुटल्यावर निखळत नाही, तसंच ३० ते ६० मिनिटे उच्च तापमान सहन करू शकते.

’   गुणधर्म- आग लागल्यास आगीचे बंब येईपर्यंत आतील भाग सुरक्षित राहू शकतो.

’   काचेचा उपयोग कुठे करावा- आपत्कालीन मार्गासाठीच्या विशेष खिडक्या, दरवाजे, पायऱ्या किंवा आगीपासून संरक्षण हव्या असलेल्या इमारतीतल्या इतर भागांसाठी उपयुक्त.

’   काचेचा उपयोग कुठे करू नये- महाग असल्याने सर्वसाधारण वापराकरता या काचेचा वापर टाळावा.

*   फ्रोस्टेड काच

’   काचेबाबतचा तपशील- काचेच्या पृष्ठभागावर प्रक्रिया करून अपारदर्शक काचा तयार करतात

’   गुणधर्म- आवश्यक तेवढय़ा प्रकाशाकरता उजेड टिकवून ठेवून प्रायव्हसीही जपणाऱ्या काचा.

’   काचेचा उपयोग कुठे करावा- लिव्हिंग रूममध्येच असलेल्या डायिनगरूमसाठी विभाजक भिंतीकरता, कार्यालयांमधल्या केबिन्सच्या पार्टिशनकरिता उपयुक्त.

’   काचेचा उपयोग कुठे करू नये- जिथे पारदर्शकता आणि अधिक प्रकाशाची आवश्यकता असेल अशा ठिकाणी उपयुक्त नाही.

घराची सजावट करताना केवळ काचांचे इंटिरिअर करायचे म्हणून कोणत्याही काचा चालतील असा विचार करू नका. प्रत्येक काचेचे फायदे तोटे अभ्यासा आणि निर्णय घ्या. तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.  

(इंटिरिअर डिझाइनर आणि सिव्हिल इंजिनीअर)

 anaokarm@yahoo.co.in