उज्ज्वल भविष्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या तरुण प्रज्ञावंतांना दरवर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. आज (२९ मार्च) मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे. यंदा विविध क्षेत्रांतील १८ लखलखत्या तरुण तेजांकितांच्या या सन्मान सोहळ्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.