करोनाकाळात भारताच्या आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने एक क्रॅश क्रंच आला आहे. सध्याच्या घडीला लिक्विडटी क्रंचही आहे. एका स्लो डाऊनची सुरुवात आपण २०१८ पासून पाहिलीच होती. त्यात करोनामुळे एक ब्रेक लागला. एकीकडे बजेटचे अंदाज पाहिले तर राज्य आणि केंद्र सरकारकडे लिक्विडटी क्रंच वाढला. आता जे संकट आलं आहे त्यामुळे अनपेक्षित खर्च वाढले आहेत आणि आवक कमी झाली आहे. खर्चाची कारणं सध्याच्या घडीला जास्त आहेत असं सांगत तृप्ती राणे (सनदी लेखापाल आणि सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार) यांनी सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबत आपलं मत मांडलं. लोकसत्ता अर्थसल्ला या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडलं. पाहा हा संपूर्ण कार्यक्रम