शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या.